Water Tanker  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : घनसावंगी तालुक्यातील बारा गावे पाणीटंचाईच्या छायेत

Water Crisis : घनसावंगी तालुक्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे सिंचन प्रकल्पासह नदी, नाल्यांना चांगले पाणी आले होते.

Team Agrowon

Jalna News : तालुक्यात एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. वाढत्या तापमानासोबत दहा ते बारा गावे पाणीटंचाईच्या छायेत आहेत. आगामी काही महिन्यांत अनेक गावांत पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

घनसावंगी तालुक्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे सिंचन प्रकल्पासह नदी, नाल्यांना चांगले पाणी आले होते. परंतु, आता प्रत्येक शेतकऱ्याकडे सोलार पॅनल बसविण्यात आल्याने दिवसा सोलार पॅनल, तर रात्रीच्यावेळी विजेवर पाण्याचा उपसा करून शेतकऱ्यांनी यंदा सर्वच पिके पाण्याखाली करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे एकीकडे शेती बागायती झाली असली, तरी दिवसेंदिवस पाण्याचा वाढता उपसा पाहता पाणीपातळी खालावली. त्यामुळे अनेक भागांतील विहिरींचा पाण्याचा उपसा एक तासावर आला. आता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्याची वेळ आली आहे.

तालुक्यात बोरगाव खुर्द व तांडे, रवना, विरेगव्हाण तांडा येथे टँकरची तर पाडुळी खुर्द व तांडा, भादली येथे विहीर अधिग्रहण सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात डहाळेगाव, मोहपुरी, पिंपरखेड बुद्रुक, घोन्सी बुद्रुक, घोन्सी खुर्द व तांडे, भेंडाळा येथे टँकर सुरू करण्याची वेळ येणार आहे. ग्रामीण भागात हातपंपांची दुरवस्था झाली आहे.

घनसावंगी तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती पाहता ग्रामीण भागातून पंचायत समितीकडे टँकरचे प्रस्ताव येत आहेत. मागणीनुसार ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, त्या गावातील पाणीटंचाईच्या परिस्थितीचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून पाहणी करून टँकर सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  
- योगिता खटावकर, तहसीलदार, घनसावंगी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT