Drought Condition agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : दुष्काळाच्या झळा तीव्र; पाणीसंकट गंभीर

Water Defict : दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Water Shortage : मुंबई : राज्याला पाणीपुवरठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ २४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून १० हजारांहून अधिक वाड्या आणि गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. राज्यात नागरिकांसह पशुधन पाण्याअभावी संकटात आले असून, लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जीवनमरणाचा प्रश्‍न असलेल्या दुष्काळाकडे मात्र डोळेझाक करण्यात आली.

राज्यात सध्या मॉन्सूनपूर्व पाऊस सुरू असला तरी हा पाऊस मुरवणीचा असल्याने पाणीसाठ्यात फारसा फरक पडत नाही. शिवाय या पावसामुळे चाऱ्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र वास्तवात तसा फारसा फरक पडेल असे शेतकऱ्यांना वाटत नाही.
राज्यात सध्या २९३४ गावे आणि ६५३९ वाड्यांवर ३६२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जास्त असल्याची माहिती पाणीपुवरवठा विभागाने दिली आहे. यात केवळ ९३ टँकर सरकारी तर ३५२९ खासगी टँकर्स आहेत. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे तो केवळ पिण्यासाठी असून, जनावरांच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे. परिणामी पशुधन संकटात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात पाण्याचे संकट अधिक गहिरे होत असून मॉन्सूनच्या पावसाकडे सर्वांचे डाळे लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल १२३६ गावे आणि ४९८ वाड्या तर नाशिक विभागात ७४६ गावे आणि २५३६ वाड्या तहानल्या आहेत. येथे अनुक्रमे १८१२ आणि ८०३ टँकरद्वारे पाणीपुवरठा केला जात आहे. पुणे विभागातील ३७७५ वाड्या आणि ६२८ गावांना ७४८ टँकरद्वारे पाणीपुवरठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरात ६९८, जालन्यात ४९५, बीडमध्ये ४३४, तर धाराशिवमध्ये १३४ टँकर पाणीपुरवठा करत आहेत.

राज्यातील मोठ्या प्रकल्पांत केवळ २१.६३ टक्के, मध्यम प्रकल्पांत ३३. ६८, तर लघू प्रकल्पांत २६.८३ टक्के पाणीपुरवठा शिल्लक आहे. सध्या सर्व धरणांत नागपूर विभागात ३८.८८, अमरावतीत ४०.१७, छत्रपती संभाजीनगरात ९.७३, नाशिक विभागात २६.३४, पुणे विभागात १८.१८, कोकण विभागात ३७.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी हा साठा ३४.३६ टक्के होता तोच आता केवळ २४.०३ टक्के आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT