Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडकी बहीण योजनेत मोठे बदल; अर्जासाठी मुदत वाढ

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : राज्यातील महिलांसाठी अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे घोषणा केली. या योजनेसाठी नोंदणी १ जुलैपासून सुरू झाली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : येत्या काहीच महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणूका लागतील. त्याआधी राज्यातील महायुतीच्या सरकारने राज्यातील महिला वर्गाला खूश करण्यासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यानंतर या योजनेसाठी नोंदणी १ जुलैपासून सुरू झाली आहे. तर या योजनेतंर्गत दरमहा १५०० रूपये शासनाकडून महिलांच्या थेट खात्यावर देण्यात येणार आहे. मात्र यातील अटी व शर्तींवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पावसाळी अधिवेशात घेरले. तसेच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासह अर्ज भरण्यासाठी उडालेल्या गोंधळानंतर आता लाडकी बहीण योजनेत सात बदल करण्यात आले आहेत. तसेच या योजनेत महिलांकडून पैशांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे थेट निलंबन केले जाईल किंवा गुन्हा दाखल करू, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाकडी बहीण योजनेची घोषणा केली आहे. तसेच याचा लाभ कोणाला मिळेल याची नियमावली तयार करण्यात आली. त्यावरून कागदपत्र गोळा करताना महिलांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच अर्ज भरण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

तर शासनाच्या जाचक अटी व शर्तींमुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अधिवेशनात घेरले. तसेच या योजनेतील काही अटी व शर्ती काढून टाकण्याची मागणी केली. त्यानंतर आता लाभार्थी महिलांना थेट लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने आता कागदपत्रांसह अटी व शर्तींमध्ये बदल केले आहेत.

लाडकी बहीण योजनेत करण्यात आलेले ७ बदल

१. या योजनेसाठी अधिवास प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली होती. त्याऐवजी आता १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र ग्राह्य मानले जाईल.

२. याच्याआधी घातलेली ५ एकर शेत जमिनीची अट आता वगळ्यात आली आहे.

३. तसेच योजनेत लाभार्थी महिलांच्या वयोगटात देखील बदल करण्यात आला असून ती आता २१ ते ६५ पर्यंत करण्यात आली आहे.

४. तर परराज्यातील महिलेला देखील या योजनेत स्थान देण्यात आले आहे. फक्त ज्या पुरूषाबरोबर लग्न झाले असेल त्याचा महाराष्ट्रात अधिवास असावा. त्यासाठी पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र चालणार आहे

५. २.५ लाखांच्या उत्पन्न दाखल्यावर देखील बदल करण्यात आला आहे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना सुट देण्यात आली आहे.

६. कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

७. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी असणारी अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT