Nitin Gadkari Agrowon
ॲग्रो विशेष

Nitin Gadkari: ऊस तोडणी यंत्रांसाठी केंद्रास सुधारित प्रस्ताव पाठवा

Sugarcane Harvester Subsidy: ऊसतोडणी यंत्रांच्या अनुदान मागणीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सुधारित प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

बाळासाहेब पाटील

New Delhi News: ऊसतोडणी यंत्रांच्या अनुदान मागणीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सुधारित प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मागील यंत्रांसाठी मंजूर झालेली १४१ कोटींची रक्कम राज्य सरकारला द्यावी, अशी मागणी केली.

कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे बुधवारी (ता. १२) बैठक झाली. या बैठकीत २०२२-२३ पासून राज्यात राबविण्यात येत असलेल्या वरील योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कृषिमंत्री कोकाटे यांच्यासह कृषी आयुक्त श्री. सूरज मांढरे, साखर आयुक्त कुणाल खेमणार, केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सह सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत ९०० ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी शासनाने मान्यता दिली असून आतापर्यंत राज्यातील २५७ पात्र लाभार्थ्यांनी ऊस तोडणी यंत्राची खरेदी केली आहे. त्यापैकी ११६ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी किमतीच्या ४० टक्के अथवा कमाल ३५ लाख अनुदान देण्यात येते.

उर्वरित १४१ लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिश्‍श्‍याची रक्कम त्वरित वितरित करण्याची मागणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. या योजनेचा राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, मजुरांच्या संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांना अधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने सुधारित प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्याची सूचना गडकरी यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT