Dr. Anil Bhikane Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Farming : शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसायातून स्वयंरोजगाराच्या संधी

Dr. Anil Bhikane : व्यवसायाच्या तांत्रिक प्रशिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी केले.

Team Agrowon

Parbhani News : शेतीला पूरक शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसायातून ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होऊ शकतील. त्यादृष्टीने या व्यवसायाच्या तांत्रिक प्रशिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी केले.

जागतिक बँक अर्थसाह्यित स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शेळी व कुक्कुटपालन सुधारण्यासाठी पशू सखींचे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शेळी व परसातील कुक्कुटपालन या विषयावर पशू सखींचे पहिले पंधरादिवसीय निवासी प्रशिक्षण, पशुवैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी (ता. २३) सुरू झाले.

या वेळी डॉ. भिकाने ऑनलाइन पद्धतीने या प्रशिक्षणाचे उद्‍घाटन केले. अध्यक्षस्थानी पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब नरळदकर होते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे, प्रकल्प सहसमन्वयक डॉ. सुनित वानखेडे यांची उपस्थिती होती. डॉ. भिकाने म्हणाले, की स्मार्ट प्रकल्पांतर्गत विद्यापीठातील विविध पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण घेतली जात आहेत.

त्याद्वारे ग्रामीण महिला सबलीकरणासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत. डॉ. नेमाडे म्हणाले, की पशुसंवर्धन विभाग, पशुपालन आणि संवर्धन या बाबतीतले वेगवेगळे प्रकल्प सुरू असून, त्याद्वारे ग्रामीण भागातील आर्थिक स्तर उंचवण्याचा प्रयत्न केले जात आहेत. डॉ. नरळदकर म्हणाले, की पशुवैद्यकीय महाविद्यालय पशुपालकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सदैव अग्रेसर आहे.

पशुसंवर्धन आयुक्तलयातील स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. कल्पना करगावकर, तांत्रिक अधिकारी डॉ. नीलेश खलाटे, विद्यापीठ स्तरावरील या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सारीपुत लांडगे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. वानखेडे यांनी केले, तर आभार डॉ. काकासाहेब खोसे यांनी मानले. प्रशिक्षण सहसमन्वयक डॉ. अनिता चप्पलवार, डॉ. साजिद अली, डॉ. सुहास अमृतकर, पशुसखी महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT