Legislative Session Agrowon
ॲग्रो विशेष

Assembly Winter Session : केंद्र सरकारकडून राज्याला दुय्यम स्थान

Farmer Issue : शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेणार होते. मात्र ही भेट स्थगित झाली

Team Agrowon

Nagpur News : शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेणार होते. मात्र ही भेट स्थगित झाली. या पार्श्‍वभूमीवर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, ‘दिल्लीतील राज्य सरकारचे महत्त्व यावरून लक्षात आले आहे’, असा टोला शुक्रवारी (ता. १५) विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात एक अहवाल पुढे आला आहे. त्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत २ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. हे सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही आणि मदत देईल, असेही वाटत नाही.

सरकार शेतकऱ्यांविषयी खोटारडी भूमिका घेत आहे. कांदा निर्यातबंदी, इथेनॉल आणि इतर प्रश्‍नांवर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री दिल्लीत अमित शहा यांना भेटणार होते. परंतु तेही यांना वेळ देत नाही. त्यामुळे दिल्लीदरबारी यांचे महत्त्व किती आहे,हे कळते;

अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉलमुळे ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यावर आधारित कारखानदारीदेखील अडचणीत आहे. आठ दिवसांपासून यावर तोडगा निघालेला नाही, हे दुर्दैव आहे.

मुदतीतच निर्णय व्हावा
आमदार अपात्रताप्रकरणी निर्णय घेण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरची मुदत दिली आहे. या मुदतीतच विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. परंतु पुन्हा अध्यक्षांनी मुदतवाढीची विनंती न्यायालयात करणे चुकीचे आहे, असे दानवे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cultivation: अमेरिकेत सोयाबीन लागवड वाढणार

Jowar Arrival Increase: अहिल्यानगरला ज्वारीच्या आवकेत वाढ

Krushi Mitra Recruitment Scam: ‘कृषिमित्र’ नावाखाली बोगस भरतीचे पेव

Maharashtra Heatwave: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा कायम

Bordeaux Paste: फळझाडांसाठी बोर्डो पेस्ट घरच्या घरी कसे बनवावे?

SCROLL FOR NEXT