Karjat Market Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Karjat Market Committee : कर्जत बाजार समितीत फेरमतमोजणीत जागा ‘जैसे थे’

Team Agrowon

Nagar APMC News : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालात फेरमतमोजणीनंतर फेरबदल झाला नाही. परिस्थिती जैसे थे राहिली. त्यामुळे आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्या गटाच्या प्रत्येकी नऊ जागा कायम राहिल्या आहेत. सभापती आणि उपसभापती कोणाचा होणार, याकडे लक्ष लागले आहे.

फेरमतमोजणीमध्ये ग्रामपंचायत गटातील सुवर्णा कळसकर यांचे एक मत कमी झाले आहे, तर सर्वसाधारण मतदारसंघातील गुलाब तनपुरे आणि संग्राम पाटील यांचे प्रत्येकी एक मत वाढले आहे. या व्यतिरिक्त इतर जागांमध्ये कोणताही बदल झाला नाही.

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार राम शिंदे व आमदार पवार गटाला प्रत्येकी ९ जागा मिळाल्या.

आमदार राम शिंदे पॅनेलच्या कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण गटातील उमेदवार भरत पावणे आणि महिला राखीव गटातील लीलावती जामदार यांनी निकालाला आव्हान देत फेरमतमोजणीची मागणी केली होती.

नगर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांच्या समोर वादी-प्रतिवादी यांच्यात युक्तिवाद होत सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकार व उमेदवारांच्या साक्षी झाल्या.

त्यानंतर जिल्हा उपनिबंधक पुरी यांनी कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण गटातील एक व महिला राखीव गटातील एक आशा दोन जागांसाठीही फेर मतमोजणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार फेरमतमोजणी झाली. मात्र, निकालात कोणताही बदल झालेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT