Wildlife Sanctuary Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Wildlife Water Crisis : हरणांसह वन्यप्राण्यांसाठी टॅंकरने पाणवठ्यांमध्ये पाणी

Water Scarcity : वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या वनहद्दीत दरवर्षी उन्हाळ्यात अन्न-पाण्यासाठी प्राण्यांना भटकंती करावी लागते.

Team Agrowon

Nashik News : वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या वनहद्दीत दरवर्षी उन्हाळ्यात अन्न-पाण्यासाठी प्राण्यांना भटकंती करावी लागते. सध्या हरणांसह वन्यप्राण्यांची तहान भागवण्यासाठी सुमारे २० ठिकाणी कृत्रिम पाणवठ्यात तसेच सोलर बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता केली जात आहे.

तालुक्यातील ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्र वन विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारित येते. यात राजापूर, ममदापूर परिसरात वन विभागाने ५ हजार ४९५ हेक्टरवर राखीव वन संवर्धन क्षेत्र राखीव प्रकल्प साकारला आहे.

तालुक्यात हरिण, काळवीट यांची सहा ते सात हजार संख्या असून काळवीट, तरस, लांडगा, ससे, कोल्हे, खोकड, रानडुक्कर, उदमांजर, रान मांजर, सायाळ, मोर व इतर पशू-पक्षी आहेत. हा भाग दुष्काळी व अवर्षणप्रवण असल्याने उन्हाळ्यात पाणी व अन्नाच्या टंचाईने हरणांचे हाल होतात.

वाढत्या उन्हामुळे डोंगर तप्त होत असल्याने राजापूर-ममदापूरच्या वनहद्दीतील हजारोंच्या संख्येने असलेल्या हरणांचा जीव कासावीस होत आहे.या वर्षी पावसाने अवकृपा केल्याने जंगलात वन्यजीवांसाठी पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. जंगलातील बहुतांश पाणीसाठे आटले असून छोठे-मोठे बंधारेही कोरडे पडले आहेत.

त्यामुळे वन्यजीवांसाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वन विभागाच्या वतीने वनक्षेत्रात विविध ठिकाणी एकूण २० कृत्रिम पाणवठे तयार केलेले असून हे पाणवठे हरीण, काळवीट आदी वन्यजीवांची तहान भागवत आहेत. वन विभागाच्या वतीने यातील काही कृत्रिम पाणवठ्यात टॅंकरद्वारे पाणी सोडले जात आहे.

या परिसरात जंगलात वन्यजीवांची संख्या वाढत असल्याने अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. सध्या गरजेनुसार ठिकठिकाणी पाणवठ्यात टँकरने पाणी टाकून वन्यजीवांची तहान भागवली जात आहे. तसेच वडपाटीच्या परिसरात हरणांसाठी गवतीकुरण तयार केले आहे. या विविध उपाययोजनांमुळे हरणांचे स्थलांतरदेखील थांबले आहे.
- राहुल घुगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यात शनिवार, रविवार पावसाचा जोर कमी राहणार

Farmers Market : शेतकरी बाजाराचा मुद्दा मागे पडला

Banana Procurement : कमी दरात केळीच्या खरेदीचा धडाका

Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्दचा शेतकरी आणि नागरिकांना काय फायदा मिळणार ?

Cotton Farming : कापूस उत्पादन वाढीसाठी मूलभूत टिप्स

SCROLL FOR NEXT