Akola News Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV Akola News : संशोधन कार्यासाठी ‘पंदेकृवि’च्या शास्त्रज्ञांचा आंतरराष्ट्रीय परिषदेत सन्मान

ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे कृषी विद्यापीठ तसेच सेंद्रिय कृषी संशोधन संस्था (स्वित्झर्लंड) यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा येथे आयोजित दोनदिवसीय परिषदेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा संशोधन कार्यासाठी गौरव करण्यात आला.

Team Agrowon

Akola News : ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे कृषी विद्यापीठ तसेच सेंद्रिय कृषी संशोधन संस्था (स्वित्झर्लंड) यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा येथे आयोजित दोनदिवसीय परिषदेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा संशोधन कार्यासाठी गौरव करण्यात आला. ‘शाश्‍वत सेंद्रिय कापूस उत्पादन : पुढील वाटचाल’ या विषयावर ही परिषद झाली.

या परिषदेमध्ये जगातील विविध देशांमधून शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये सेंद्रिय कापूस उत्पादनासाठी विविध पद्धतींचा अंगीकार तसेच शाश्‍वत तंत्रज्ञानाचा विकास या विषयावर विचार मंथन करण्यात आले.

परिषदेमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांचे ‘शाश्‍वत कापूस उत्पादनासाठी हवामान अनुकूल पद्धतींचा अंगीकार’ या विषयावर विशेष भाषण आयोजित करण्यात आले.

तसेच विद्यापीठातील कृषी विद्या विभागाचे विभाग प्रमुख तथा सेंद्रिय शेती संशोधन व विस्तार केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ पसलावार यांनी ‘शाश्‍वत विकासासाठी सेंद्रिय कृषी पद्धती’ या विषयावर सादरीकरण केले.

कापूस संशोधन केंद्राचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. निळकंठ पोटदुखे, विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. नितीन कोंडे, कापूस पैदासकार डॉ. सुरेंद्र देशमुख, सेंद्रिय शेती संशोधन व विस्तार केंद्र येथील डॉ. परिक्षित शिंगरूप तसेच डॉ. संजय काकडे, डॉ. योगेश इंगळे, सचिन इंगळे, शैलेंद्र रावत, अमोल हरणे यांनीही मौखिक स्वरूपातील शोध प्रबंध सादर केले. डॉ. ओमप्रकाश राखोंडे यांनी भित्तिपत्रकाद्वारे संशोधन उपलब्धी सादर केली.

परिषदेदरम्यान जागतिक स्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावर सेंद्रिय कापूस संशोधनात उत्कृष्ट कार्य केलेल्या संशोधकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विद्यापीठातील कृषी विद्या विभागाचे प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार यांना ‘उत्कृष्ट कापूस संशोधक’ म्हणून पुरस्कृत करण्यात आले.

यासोबतच कापूस पैदासकार डॉ. सुरेंद्र देशमुख यांना ‘प्रसिद्ध कापूस संशोधक’ म्हणून पुरस्कृत करण्यात आले. तसेच कृषी पद्धती व पर्यावरण केंद्रातील मृदा शास्त्रज्ञ तथा समन्वयक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम डॉ. नितीन कोंडे यांना युवा शास्त्रज्ञ म्हणून गौरविण्यात आले.

सदर परिषदेमध्ये उत्कृष्ट भित्तिपत्रकासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. राखोंडे यांचा उत्कृष्ट भित्तिपत्रकासाठी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कृत झालेले सर्व शास्त्रज्ञांनी यशाचे श्रेय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे तसेच विद्यापीठातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Latest Update : मॉन्सूनने अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; राज्यात मॉन्सून सरींची हजेरी

Brown Biorefinery: ‘ब्राउन बायोरिफायनरी’तून कृषी अवशेषांचे मूल्यवर्धन

Women Farmers: भूमिकन्यांसाठी पुढचे पाऊल

Sugarcane Crop Protection: उसात वाढतोय जाळे करणाऱ्या कोळीचा प्रादुर्भाव

Ladki Bahin Yojana e-KYC: लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी'साठी संधी मिळणार का? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT