Dr. Tushar Aatere Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रीय माहिती महत्त्वाची

Dr. Tushar Aatere : कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे व कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक ती शास्त्रीय माहिती पोहोचली पाहिजे,’’ असे प्रतिपादन अटारी पुणेचे शास्त्रज्ञ डॉ. तुषार आटरे यांनी केले.

Team Agrowon

Nashik News : ‘‘हवामान बदल हेच मोठे आव्हान शेती क्षेत्रासमोर राहणार आहे. त्यामुळे हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मात करण्यासाठी शेती संबंधित माहिती व पूर्वसूचना वेळेवर दिल्या गेल्या पाहिजेत. कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे व कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक ती शास्त्रीय माहिती पोहोचली पाहिजे,’’ असे प्रतिपादन अटारी पुणेचे शास्त्रज्ञ डॉ. तुषार आटरे यांनी केले.

वडेल (ता.मालेगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या १० व्या शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक अध्यक्षा मेघा बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी अटारी पुणे शास्त्रज्ञ डॉ. तुषार आटरे, कांदा व लसूण संशोधन महासंचलनालयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजीव काळे,

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ होळकर, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत औचारे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच कृषी महाविद्यालय (काष्टी, ता. मालेगाव), गहू संशोधन केंद्र निफाड गहू विशेषज्ञ डॉ.सुरेश दोडके, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरीचे सहयोगी संचालक डॉ. हेमंत पाटील, डाळिंब संशोधन व प्रसार केंद्र,

लखमापूरचे डॉ.सचिन हिरे, नाशिकचे आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, कृषी विज्ञान केंद्र, नाशिकचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नितीन ठोके, मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ आहिरे, तालुका कृषी अधिकारी श्री.गोरटे, साहाय्यक आयुक्त,पशुसंवर्धन डॉ.जावेद एस.खाटिक, शेतकरी प्रतिनिधी गोरख जाधव आदी उपस्थित होते.

शेतीतील हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान कशी मदत करू शकते. याकरिता शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ, आणि कृषी विभाग यांनी एकत्रितरित्या काम करणे गरजेचे आहे, असे मेघा बोरसे सांगितले.

प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ अमित पाटील, विषय विषेशज्ञ रूपेश खेडकर (कृषी विद्या), पवन चौधरी (उद्यानविद्या) विजय शिंदे (मृद्शास्त्र), संदीप नेरकर (पशुविद्यान आणि दुग्धशास्त्र ), विशाल चौधरी शास्त्रज्ञ (पीक संरक्षण ) यांनी २०२३ मधील प्रगती अहवाल आणि कृती आराखड्याचे सादरीकरण केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT