Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Industry : शेतीपूरक, प्रक्रिया उद्योगाच्या योजना शेतकऱ्यांना फायदेशीर

Agriculture Scheme : शेतकऱ्यांना आवश्यक असणारी अवजारे, शेतीला पूरक आणि प्रक्रिया उद्योगात फायदेशीर ठरतील, अशा अनेक योजना कृषी विभागाकडे आहेत.

Team Agrowon

Solapur News : शेतकऱ्यांना आवश्यक असणारी अवजारे, शेतीला पूरक आणि प्रक्रिया उद्योगात फायदेशीर ठरतील, अशा अनेक योजना कृषी विभागाकडे आहेत. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी कारंबा (ता.उत्तर सोलापूर) येथे केले.

कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतून निवडल्या गेलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना धान्य साठवणुकीसाठी धान्य कोट्यांचे वाटप आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभाच्या बांधावरील फळबाग लागवड योजनेचा प्रारंभ मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संभाजी दडे, विश्वकर्मा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक सुतार, कृषी पर्यवेक्षक एम.एस. सिरसट, कृषी सहायक ज्ञानेश्वर गोडसे, कृषी सहायक आर. एम. काळे, माजी सरपंच बाळासाहेब सुतार, माजी सरपंच मल्लिनाथ तंबाके,

शालेय समितीचे अध्यक्ष संजय आदाटे, सोसायटीचे संचालक अनुरथ गुंड, विजय बहिर्जे, आनंद सुतार, अमोल सुतार, शशिकांत दुधाळ, अतुल रोकडे, बाळासाहेब सुपेकर, मल्लिनाथ सुपेकर, बाळासाहेब माने, दत्तात्रय भुट्टे यावेळी उपस्थित होते. यावेळी आठ शेतकऱ्यांना धान्य कोठी वाटण्यात आल्या, तर तीन शेतकऱ्यांच्या शेतावर बांधावरील फळबाग लागवड योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

मनीषा मिसाळ म्हणाल्या, ‘‘शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी सातत्याने संपर्क ठेवला पाहिजे, आता योजनांच्या लाभासाठी महाडिबीटीमुळे मोठी सोय झाली आहे, एकाच अर्जावर अनेक योजनांचा लाभ आपल्याला घेता येतो,’’ असेही त्या म्हणाल्या. संभाजी दडे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

विनायक सुतार यांनी प्रास्ताविकात शासनाच्या योजना भरपूर आहेत, आपण त्याची माहिती घेत नाही, आपण त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे, असे सांगितले. कृषी सहायक ज्ञानेश्वर गोडसे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT