Pune Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain: पुणे जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाच्या तुरळक सरी

Pune Rain Update: पुणे जिल्ह्याच्या काही भागात पावसाने मंगळवारी (ता. ६) हजेरी लावली. मात्र, दिवसभर ऊन पडले असले तरी अनेक भागात ढगाळ, तर काही ठिकाणी ऊन सावल्याचा खेळ सुरू होता.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: पुणे जिल्ह्याच्या काही भागात पावसाने मंगळवारी (ता. ६) हजेरी लावली. मात्र, दिवसभर ऊन पडले असले तरी अनेक भागात ढगाळ, तर काही ठिकाणी ऊन सावल्याचा खेळ सुरू होता. रात्री काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. झालेल्या पावसामुळे खरीप पूर्व शेतीकामांना सुरुवात झाली असून काही प्रमाणात शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला.

पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शिरूर, पुरंदर, इंदापूर, बारामती, खेड तालुक्यांतील काही भागात मशागतीना सुरुवात झाल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता. ६) सायंकाळनंतर अचानक वातावरणात बदल झाला.

तर सायंकाळनंतर वादळी वारे वेगाने वाहू लागल्याने झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाल्याने भात रोपवाटिकांच्या कामांना वेग येणार आहे. पुणे शहरातील अनेक उपनगरात सायंकाळपर्यंत ऊन्हाची झळ जाणवत होती.

रात्री दहा वाजेच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन उपनगरात काही ठिकाणी शिडकावा. त्यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार झाला असून कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. तर तळेगाव येथे १६.८ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.

बुधवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे १४.५ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. तर निमगिरी येथे १२.५ मिलिमीटर, भोरमध्ये ९.५ मिलिमीटर, कुरवंदे ६.५ मिलिमीटर, लवासा ६.०, गिरीवन ०.५, बल्लाळवाडी ०.५, डुडूळगाव ०.५ मिलिमीटर पाऊस झाला असून पुणे शहरातील उपनगरातही पावसाचा तुरळक शिडकावा झाला. तर काही ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहत असल्याने आंबा फळपिकांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT