Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Mahamarg : 'शक्तिपीठ' रद्द झालाच नाही; हसन मुश्रीफांकडून खुलासा घ्यायला हवा : सतेज पाटील

Satej Patil : शक्तिपीठ वर्ध्यातून कोल्हापूर-गोवा असा जाणार आहे. कोल्हापुरातील शक्तिपीठ रद्द झाला असेल तर तो मार्ग हवेतून गोव्यापर्यंत जाणार का? असा सवालही सतेज पाटील यांनी केला.

sandeep Shirguppe

Satej Patil Vs Hasan Mushrif : शक्तिपीठ महामार्ग रद्द झालेला नाही. विधानसभेच्या मतांसाठी महायुती महाराष्ट्र आणि जिल्ह्याची घोर फसवूणक करत आहे. महामार्ग केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरताच रद्द होऊ शकतो का? याचा खुलासा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून घेतला पाहिजे, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी आज दिले. कसबा बावडा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, ‘शक्तिपीठ महामार्ग केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. तो केवळ कोल्हापूरपुरता रद्द करता येतो का? १५ ऑक्टोबरचा आदेश असताना तो २३ तारखेला का जाहीर केला. हा महामार्ग कोल्हापूरमधून गोव्याला जाणार आहे. तो मध्येच कसा रद्द होऊ शकतो. आचारसंहिता लागू असतानाही महायुतीकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे पाटील म्हणाले.

शक्तिपीठ वर्ध्यातून कोल्हापूर-गोवा असा जाणार आहे. कोल्हापुरातील शक्तिपीठ रद्द झाला असेल तर तो मार्ग हवेतून गोव्यापर्यंत जाणार का? १५ ऑक्टोबरला हा मार्ग रद्द झाल्याची माहिती सांगितली जात असेल, तर तो आत्तापर्यंत जाहीर का केला नाही? आत्ता केला असेल, तर आचारसंहितेता कसा केला, मागील तारीख टाकून काढलेली ऑर्डर आहे का? याची माहिती घ्यावी लागणार असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.’

सांगली जिल्ह्यात जोरदार विरोध

गोवा ते नागपूर शक्तिपीठ अधिसूचना रद्द केल्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. हा निर्णय फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठी जाहीर केल्यामुळे त्याविषयी सांगली महामार्ग विरोधी कृती समितीने संताप व्यक्त केला. शासन निर्णयाची होळी करून सांगली जिल्ह्यातील मार्गासह संपूर्ण शक्तिपीठ रस्ताच रद्द करण्याची मागणी केली. बुधगाव (ता. मिरज) येथे शेतकऱ्यांच्या बांधावर बुधवारी (ता. २३) आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT