Satara Tourism Agrowon
ॲग्रो विशेष

Satara Tourism : सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार ः पालकमंत्री देसाई

Mahabaleshwar Tourism : पूर्वीच्या काळी जिल्ह्यातील नागरिक रोजगारासाठी पुणे, मुंबई येथे जात होते. परंतु, जिल्ह्यात कृषी, औद्योगिक क्रांतीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाले आहेत.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर, कास पठार अशी विविध ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. पर्यटन विभागाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातून सातारा जिल्हा पर्यटन हब करून जिल्ह्याला आर्थिक चालना देणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री देसाई यांनी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ध्वजवंदन केले. या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहुल अहिरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

श्री.देसाई म्‍हणाले,‘‘ पूर्वीच्या काळी जिल्ह्यातील नागरिक रोजगारासाठी पुणे, मुंबई येथे जात होते. परंतु, जिल्ह्यात कृषी, औद्योगिक क्रांतीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाले आहेत. कोयना धरण बांधले.

या धरणाच्या ६७ टक्के पाण्यावर २ हजार मेगावॉट वीज निर्मिती सुरु करून सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला वीज दिली. कोयनेकाठच्या शेतकऱ्यांना एकही रुपया न घेता पाणी देण्याचा निर्णय महसूल विभागाच्या माध्यमातून (कै.) लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी घेतला होता.

दरम्यान, पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरणही करण्यात आले. ध्वजवंदनापूर्वी श्री. देसाई यांनी पोवई नाक्यावरील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Situation: दुष्काळ चारा नियोजनाचा!

Banana Cultivation Issue: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंद मिळेनात

Groundnut Seed Issue: ‘कृषी’कडून वितरित भुईमूग बियाण्यांवर शेतकऱ्यांची नाराजी; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात विट्यात महिलांचा मोर्चा

Agri Power Supply Issue: शेतीसाठी सलग सहा तास वीज द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

SCROLL FOR NEXT