Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : पीककर्ज वितरणात सातारा जिल्हा बॅंकेची आघाडी

Kharif Crop Loan : जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेशी व त्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंकेशी जोडलेले आहेत.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी २५२० कोटी पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३० सप्टेंबरअखेर दोन लाख ५१ हजार ८९७ शेतकरी सभासदांना १८८५ कोटी ७६ लाख रुपये म्हणजे उद्दिष्टाच्या ७५ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे.

त्यात जिल्हा बॅंकेने सर्वाधिक १२५६ कोटी ५२ लाख रुपये म्हणजे उद्दिष्टांच्या ९१ टक्के कर्ज वितरण केले आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून याही हंगामात अनास्था दिसून आली असून, या बँकांकडून अनुक्रमे अवघे ६४ व ४० टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेशी व त्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंकेशी जोडलेले आहेत. पीककर्ज वाटपात जिल्हा बॅंक आघाडीवर असून, या बँकेस १३८२ कोटीं ५० लाख उद्दिष्ट होते.

या उद्दिष्टापैकी १२५६ कोटी ५२ लाख रुपये कर्ज वितरण केले आहे. या बँकेने उद्दिष्टांच्या ९१ टक्के कर्ज वितरण केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांपैकी काही बँका कर्ज वितरणाकडे लक्ष देत असतात इतर बँका मात्र कर्ज वितरणाकडे काणाडोळा केला जात आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांना ७३१ कोटी ५० लाख रुपयांचे खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टांपैकी ४६७ कोटी ३२ लाख रुपये म्हणजेच ६४ टक्के कर्ज वाटप केले गेले आहे. खासगी बँकांनी राष्ट्रीयीकृत बँकांच्या पावलावर पाऊल ठेवत कर्ज वितरण कऱण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

या बँकांना ४०२ कोटी ५० लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टापैकी १६० कोटी २३ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. या हंगामात बँकांकडून उद्दिष्टांच्या अवघे ४० टक्के कर्ज वितरण केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT