Sangli APMC Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Cess : सांगली बाजार समितीत सेस चुकवेगिरीला चाप

Sangli APMC : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतीमालाच्या आवकेची दैनंदिन ऑनलाइन नोंद होणार आहे. यासाठी बाजार समितीने नवीन ऑनलाइन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतीमालाच्या आवकेची दैनंदिन ऑनलाइन नोंद होणार आहे. यासाठी बाजार समितीने नवीन ऑनलाइन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच्या या निर्णयाने व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या सेस चुकवेगिरीला चाप बसणार आहे.

वसंतदादा पाटील मार्केट यार्डात दरारोज शेतीमालाच्या शेकडो गाड्यांची आवक होत असते. येथे कर्नाटकासह इतर राज्यांतूनही शेतीमालाच्या गाड्या येतात, यामध्ये हळद, गूळ, मिरची, सोयाबीन, मका, बेदाणा, इतर धान्य आणि कडधान्याचा समावेश आहे.

या आलेल्या शेतीमालावर बाजार समितीकडून नाममात्र सेसची आकारणी केली जाते. मात्र या सेस आकारणी आणि वसुलीमध्ये मोठी गळती असल्याच्या तक्रारी शेतकरी संघटेसह इतर संघटनांनी केल्याने बाजार समिती प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेतली आहे.

सेस चुकवेगिरीला आळा बसण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी बाजार समितीने येणाऱ्या आवकेच्या नोंदीसाठी नवी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची यंत्रणा तयार केली जात असून लवकरच ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. यामुळे नेमके कोण व्यापारी आणि किती प्रमाणात सेस चुकविगिरी करतात हेही स्पष्ट होईल.

ज्या व्यापाऱ्यांकडून सेस चुकविगिरी केल्याचे स्पष्ट होईल त्याच्यावर दंडासह कारवाई केली जाईल. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नामध्येही वाढ होण्यास मदत होईल. बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी बाजार समितीने विविध उपायोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल.

मार्केट यार्डात सेस चुकवेगिरी होत असल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे आल्या आहेत. येणाऱ्या आवकेची प्रवेशव्दारावरच नोंद होऊन शेतीमालाची गाडी आवारात येईल. या वाहनाची ऑनलाइन नोंद बाजार समितीकडे होईल. आलेल्या गाडीमध्ये नेमका कोणता शेतीमाल असून त्याचे वजन किती याचीही नोंद होणार आहे. याशिवाय कोणत्या दुकानातून कोणत्या मालाची गाडी बाहेर गेली याचीही माहिती मिळण्यास मदत होईल.
- सुजय शिंदे, सभापती, सांगली कृषी उपन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT