Grapes Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Export: सांगली जिल्ह्यातून तीन हजार टन द्राक्ष निर्यात

Grape Market: प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकरी द्राक्ष निर्यातीसाठी पुढे आले आहेत. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातून २६२ कंटेनरमधून आतापर्यंत तीन हजार ६०० टन द्राक्षांची निर्यात केली आहे.

अभिजीत डाके

Sangli News: प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकरी द्राक्ष निर्यातीसाठी पुढे आले आहेत. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातून २६२ कंटेनरमधून आतापर्यंत तीन हजार ६०० टन द्राक्षांची निर्यात केली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यात वाढेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त आहे.

मॉन्सून आणि परतीचा मॉन्सून जास्त प्रमाणात झाल्यामुळे वेळेवर द्राक्ष छाटण्या झाल्या नाहीत. आगाप छाटणी झालेल्या द्राक्षांचे नुकसान झाले. परिणामी उत्पादन घटले आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीतून काटेकोर व्यवस्थापन करून द्राक्ष बागा वाचवल्या. हंगामाच्या सुरुवातीला फारशी निर्यातीची गती नव्हती. गेल्या महिन्याच्या मध्यापासून निर्यातीला गती आली आहे.

यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १० हजार १६५ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अंदाजे एक हजाराने वाढली आहे. जिल्ह्यातून गत वर्षी १८ हजार ७७१ टन द्राक्षांची निर्यात झाली होती.

जिल्ह्यातून तासगाव आणि खानापूर या दोन तालुक्यांतून सर्वाधिक शेतकरी निर्यातीस पुढे येतात. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मिरज, जत तालुक्यांतील शेतकरीही द्राक्ष निर्यातीस पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाही तासगाव, खानापूर या तालुक्यांस मिरज आणि जत तालुका द्राक्ष निर्यातीसाठी आघाडी घेत आहेत.

निर्यात द्राक्षांसाठी पोषक वातावरण आणि परदेशात चांगला दर मिळत आहे. नेदरलँड, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये सर्वाधिक द्राक्ष निर्यात झाली आहे. दरही चांगला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत आहे. जिल्ह्यातून सुमारे १५ देशांत द्राक्ष पोहोचली आहेत. नेदरलँड, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, चीन, डेन्मार्कमधून द्राक्षाची सर्वाधिक मागणी आहे. मार्चमध्ये सर्वाधिक द्राक्ष निर्यात होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात स्थिती

देश कंटेनर टन

युरोपीय १३१ १७२८

आखाती १३१ १८७२

एकूण २६२ ३६००

जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला गती आली आहे. यंदाच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत निर्यात वाढेल असा अंदाज आहे.
प्रकाश नागरगोजे, कृषी अधिकारी (निर्यात), सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT