Sangli Turmeric Market agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Turmeric Market : सांगलीच्या नव्या हळदीला उच्चांकी भाव; नवीन सौद्यांना सुरूवात

New Turmeric Sangli : नवीन हळदीला सरासरी १५ हजार ते १६ हजार रुपये असा दर मिळतो असतो परंतु यंदा हळदीच्या दरात पहिल्या टप्प्यात तरी तेजी दिसून आली आहे.

sandeep Shirguppe

Sangli Bajar Samiti : सांगली जिल्ह्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाची नवीन हळद बाजारात येऊ लागली आहे. नवीन हळदीची वसंतदादा मार्केट यार्डात मुहुर्तावर सौदे काढण्यात आले. नव्या हळदीला प्रतिक्विंटल २१ हजार ३०० रुपये दर मिळाला. जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे यांच्या हस्ते नव्या हळदीच्या सौद्यास सुरवात झाली.

नवीन हळदीला सरासरी १५ हजार ते १६ हजार रुपये असा दर मिळतो असतो परंतु यंदा हळदीच्या दरात पहिल्या टप्प्यात तरी तेजी दिसून आली आहे. नवीन ३ हजार ८१३ हळद पोत्यांची आवक झाली. हंगामाच्या प्रारंभी हळदीला चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

वसंतदादा मार्केट यार्डातील श्री गणपती कृषी जिल्हा औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटी येथील त्रिमूर्ती ट्रेडिंग कंपनीत नव्या हळदीच्या सौद्यास सुरवात झाली.

मार्केट यार्डात हंगामातील बाजार समितीत राजापुरी (स्थानिक) हळदीची ३ हजार ८१३ पोत्यांची (१ पोते ५० किलोचे) आवक झाली. हळदीचे सौदे ४० दुकानांत काढले गेले. शेतकरी नितीन कोकाटे यांच्या दोन पोती हळदीला प्रतिक्विंटलला २१ हजार ३०० रुपये, तर पेड (ता. तासगाव) येथील शेतकरी विनोद शेंडगे यांच्या राजापुरी हळदीला प्रतिक्विंटल १६ हजार ३०० हजार रुपये दर मिळाला. हळदीला सरासरी प्रति क्विंटल १५ ते १६ हजार रुपये दर मिळाला.

बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सांगली बाजार समिती ही हळदीसाठी देशात प्रसिद्ध आहे. तेव्हा, शेतकऱ्यांनी खुल्या सौद्यामध्ये अधिकाधिक हळद विक्रीसाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत यावे. सध्या हळद काढणीला गती आलेली नाही. त्यामुळे फेब्रुवारीच्या मध्यापासून बाजार समितीत नव्या हळदीची आवक आणखी वाढणा आहे. हंगामाच्या सुरवातीलाच दर चांगले असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अशी माहिती सभापती शिंदे यांनी दिली.

यावेळी उपसभापती रावसाहेब पाटील, संग्राम पाटील, आनंदराव नलवडे, बाबगोंडा पाटील, स्वप्नील शिंदे, बिराप्पा शिंदे, शशिकांत नागे, बसवराज बिराजदार, प्रशांत पाटील-मजलेकर, काडाप्पा वारद, मारुती बंडगर, माजी सभापती सिकंदर जमादार, सचिव महेश चव्हाण, उपसचिव नितीन कोळसे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, गोपाळ मर्दा, मनोहर सारडा, शरद शहा यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते.

प्रतवारीनुसार हळदीचे दर (प्रतिक्विंटल हजारात)

प्रत १ (अंगठी), १५ हजार ८०० ते १६ हजार ६००, प्रत २ १४ हजार ते १४ हजार ५००, गड्डा ११ हजार ५०० ते १२ हजार ५००, कणी १२ हजार ८०० ते १३ हजार ५०० असा दर सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT