Sangli Sugarcane Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Sugarcane Rate : सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली, पहिली उचल ३१७५

Sugarcane Issue Sangli : सांगली जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली असून पहिली उचल एकरकमी ३ हजार १७५ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

sandeep Shirguppe

Sangli District Sugarcane Rate : मागच्या दोन महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात ऊस दराच्या प्रश्नावरून कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात संघर्ष सुरू आहे. तीन बैठका होऊनही कोणताही निर्णय न झाल्याने शेतकरी संघटनांनी टोकाची भूमिका घेत जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचे धुराडे बंद पाडले होते. दरम्यान काल(ता.२७) कारखानदार, जिल्हाधिकारी आणि शेतकरी संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला आहे.

जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली असून पहिली उचल एकरकमी ३ हजार १७५ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या कारखान्यांची रिकव्हरी जास्त त्या कारखान्यांनी ३१७५ रुपये प्रमाणे दर द्यायचे तसेच कमी रिकव्हरी असणाऱ्या कारखान्यांनी ३१०० रुपये देण्याचा निर्णय झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऊसदराच्या प्रश्नावर बैठक झाली. यावेळी आमदार अरुण लाड, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, दीपक मगदूम उपस्थित होते.

या बैठकीमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्याची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १२.५० उताऱ्यास प्रतिटन तीन हजार २५०, साडेबारा उताऱ्यापेक्षा कमी असणाऱ्या कारखान्यांनी तीन हजार १५० रुपये तर दुष्काळी पट्ट्यातील कारखान्यांनी प्रतिटन तीन हजार १०० रुपये दर द्यावा, असा अंतिम प्रस्ताव दिला होता.

यावर कारखानदारांनी नकाराघंटा दाखवत पहिली उचल एकरकमी प्रतिटन तीन हजार १७५ रुपये आणि ११ टक्क्यांपेक्षा कमी साखर उतारा असणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन तीन हजार १०० रुपये दराचा तोडगा मान्य केला आहे. कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोडगा मान्य केला आहे.

साखर कारखानदार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ऊसदराची कोंडी फोडण्यात प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यशस्वी ठरल्या आहेत. शेतकरी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आम्ही त्यांचे आभार मानले आहेत. प्रतिटन एकरकमी तीन हजार १७५ रुपये दर मिळविण्यात संघटनेला यश आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT