Sand Mafia  Agrowon
ॲग्रो विशेष

Sand Mafia : रेती माफिया पुन्हा सक्रिय

Illegal Sand Excavation : बेकायदा होणाऱ्या रेती उपशावर कारवाईसाठी महसूल विभागाकडून गस्त घातली जात आहे; मात्र त्यांच्या नाकावर टिच्चून रेती माफिया बिनधास्त खाडीत बेकायदा रेती उपसा करीत आहेत.

Team Agrowon

Dombivali News : पावसाळ्यात खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू मिळत असल्याने या दिवसांत वाळूमाफिया सक्रिय असतात. बेकायदा होणाऱ्या रेती उपशावर कारवाईसाठी महसूल विभागाकडून गस्त घातली जात आहे; मात्र त्यांच्या नाकावर टिच्चून रेती माफिया बिनधास्त खाडीत बेकायदा रेती उपसा करीत आहेत.

शुक्रवारी महसूल विभागाने डोंबिवली मोठागाव परिसरात कारवाई केली; मात्र आता पुन्हा खाडीपात्रात रेती माफियांच्या बोटी पुन्हा रेतीउपसा करताना आढळून आल्या. यावरून महसूल विभागाच्या कारवाईचा कोणताही धाक रेतीमाफियांना नसल्याचे यावरून दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मुंब्रा, कळवा, दिवा, भिवंडी ग्रामीण भाग, डोंबिवलीतील कोपर, मोठागाव, रेतीबंदर खाडी परिसर, कल्याण रेतीबंदर दुर्गाडी खाडी परिसरात बेकायदा रेती उपसा करण्याचे प्रमाण मोठे आहे. बेकायदा रेतीउपसा करणाऱ्या रेती माफियांवर ठाणे जिल्हा प्रशासन महसूल विभागाकडून वारंवार कारवाई करण्यात येत असते; मात्र अद्यापपर्यंत बेकायदा रेती उपशाला आळा घालणे महसूल विभागाला जमलेले नाही.

पावसाळ्यात खाडीपात्रात वाळू वाहून येते. यामुळे दिवसांत रेती उपसादेखील मोठ्या प्रमाणात सुरू असतो. हे रेतीमाफिया खाडी परिसरात खड्डे करून तेथे रेती जमा होईल, अशी व्यवस्था करतात. नंतर त्या ठिकाणी सक्शन पंप किंवा इतर पद्धतीने रेतीउपसा केला जातो. दिवसभरात रेतीउपसा करून रात्री ट्रकमधून याची बेकायदा वाहतूकदेखील केली जाते.

खारफुटीचा आसरा

महसूल विभागाच्या कारवाईचा सुगावा लागताच रेतीमाफिया बोटी घेऊन खाडीकिनारी दाट खारफुटीचा आसरा घेत लपतात. अधिकारी जाताच पुन्हा ते बोटी घेऊन खाडीपात्रात उतरतात. हे चित्र उघड उघड दिसत असताना महसूल विभागाकडून ठोस अशी कारवाई का केली जात नाही, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT