Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Price : संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्ग दूध दरवाढीसाठी अडविला

Sambhajinagar-Jalgaon Highway : शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (ता.९) छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (ता.९) छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या वेळी दुग्धाभिषेक व महामार्गावर दूध सांडून सरकार विरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांचा मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे यांच्या नेतृत्वात स्थानिक महात्मा फुले चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी महामार्गावर दूध सांडून सरकारचा निषेध व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे ज्ञानेश्वर जाधव हे महामार्गावर मांडी घालून बसले. तसेच जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीपराव बोरसे यांनी कार्यकर्त्यांच्या अंगावर दूध सांडून दुग्धाभिषेक केला.

आंदोलनामुळे वाहनाच्या लांबचलाब रांगा लागल्या होत्या. या वेळी तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, युवक काँग्रेसचे प्रशांत नागरे, शहराध्यक्ष मुदतसर पटेल, माजी उपसभापती सुभाष गायकवाड, हाफिज मन्सुरी, ज्ञानेश्वर जाधव, गोविंद गायकवाड, देविदास ढंगारे, आकाश गायकवाड, शैलेश बोरसे, सय्यद इफ्तेखार, अजित भोपळे, मोबिन पाशा यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या...

दुधाला सरसकट ४० रुपये भाव द्यावा.

सरकारने ५ रुपये अनुदान विनाअट द्यावे.

अनुदान वाटपात कोणीतीही जाचक अट ठेवू नये.

केंद्र सरकारने दूध पावडर आयात करू नये.

शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव देऊन अनुदानात कोणतीही जाचक अट ठेवू नये या मागणीसाठी आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
विश्वास औताडे, जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT