CM Majhi Shala, Sundar Shala Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

CM Scheme : ‘माझी शाळा’ स्पर्धेत साखरा राज्यात प्रथम

CM Majhi Shala, Sundar Shala Scheme : साखरा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा'' या योजनेअंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये राज्यातून प्रथम पारितोषिक पटकवले आहे.

Team Agrowon

Washim News : वाशिम जिल्ह्यातील साखरा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा'' या योजनेअंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये राज्यातून प्रथम पारितोषिक पटकावत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. शाळेला ५१ लाखांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

ग्रामीण भागातील एका शाळेने केलेल्या कामगिरीबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी एस. बुवनेश्वरी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती चक्रधर गोटे, शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

साखरा शाळेला बहुमान मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर, जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र महाले आणि सदस्य, सरपंच अनिता राऊत यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आणि मुख्याध्यापक अंबादास कऱ्हे आदींनी परिश्रम घेतले.

या शाळेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे ५१ लाखांचे बक्षीस मिळवले आहे. शाळा व परिसराचे सुशोभीकरण, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमांत सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम, विविध क्रीडा स्पर्धा आयोजन, आरोग्य तपासणी, शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता, भौतिक सुविधा तसेच अध्यापन व अध्ययनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता, तंबाखूमुक्त, प्लॅस्टिकमुक्त पर्यावरण, शिल्लक अन्न प्रक्रिया विल्हेवाट, शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी संस्थांचा शाळा उपक्रमात सहभाग यांसह विविध मुद्यांवर विशेष भर देण्यात आला.

‘गुणवत्तेच्या नावाखाली पालकांचा कल खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असताना साखरा सारख्या शाळांचा आदर्श जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षकांनी घेण्यासारखा आहे.
चंद्रकांत ठाकरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, वाशीम
साखरा येथील शाळा राज्यात प्रथम ठरली ही बाब जिल्ह्यासाठी गौरवाची आणि सर्व शाळांसाठी प्रेरणादायी आहे. यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. तसेच शाळा व्यवस्थापन समितीसह शाळेच्या विकासात योगदान दिलेल्या सर्वसामान्य नागरिकांचेही अभिनंदन. जिल्ह्यातील इतर शाळासुद्धा साखरा जिल्हा परिषद शाळेपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जातील अशी आशा आहे.
वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT