Sugarcane Issue agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Issue : साखर कारखान्यांच्या मनमानी कारभारावर स्वाभिमानीचा हल्लाबोल, ४ तास बंद पाडला कारखाना

Sangli Farmers : सांगली जिल्ह्यातील राजेवाडी येथील सदगुरू सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बंद पाडण्यात आला.

sandeep Shirguppe

Sugarcane Farmers Sangli : उसाला दर देण्याबरोबर ऊस उत्पादक सभासदांचा नियमीत ऊस तोडण्यााठी सांगली जिल्ह्यातील राजेवाडी येथील सदगुरू सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बंद पाडण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसह उसाची वाहने रोखण्यात आली.

तसेच ३ ते ४ तास वाहतूक रोखण्यात आली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. संतप्त कार्यकर्त्यांनी गेट मोडून गव्हाणीमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न केला.

अखेर कारखाना प्रशासनाने १०० रुपये वाढीचे पत्र प्रशासन अधिकारी उदय जाधव यांनी दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले.

उसाला वाढीव दर द्यावा, सभासद शेतकऱ्याचा ऊस तोडायला प्राधान्य द्यावे, आटपाडी तालुक्यातील ऊस तोडणीसाठी अग्रक्रम द्यावा, राजेवाडी परिसरात प्रदूषित पाणी सोडले जाते, त्याचा बंदोबस्त करावा आदी मागण्यांसाठी राजेवाडी कारखान्यावर खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

आंदोलकांसमोर बोलताना खराडे म्हणाले, सद्गुरू कारखाना सांगली जिल्ह्यात सर्वात कमी दर देतोय, तो वाढवून दिला पाहिजे, म्हणून आंदोलन केले. आजपासून गळीत होणाऱ्या उसाला वाढीव १०० रुपये, तर यापूर्वी गाळप झालेल्या उसाला वाढीव ५० रुपये देण्याचे प्रशासनाने कबूल करून तसे लेखी पत्र दिले.

आंदोलनात आटपाडी तालुका अध्यक्ष विजय माने, सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजी बागल, मनसेचे प्रकाश गायकवाड, ऋषिकेश साळुंखे, अजित बोरकर, अजित कोडग, शहाजन शेख, ईश्वर माने, तानाजी सागर, नंदकुमार माने, केशव शिरकांदे, कृष्णा पुजारी, राजेंद्र पाटील, बाबुराव शिंदे, अमित दबडे, तानाजी पारेकर, सुरेश वडुल, शिवराज गायकवाड, मदन जाधव, सिराज तांबोळी, संदीप शिरोटे, सुरेश पाचित्रे, सय्यद मुलाणी, संजय यादव आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT