Sugarcane Workers agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ‘कादवा’कडून २७६४.२० रुपयांप्रमाणे ‘एफआरपी’

Team Agrowon

Nashik News : दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२३-२४ मधील एफआरपीपोटी अंतिम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करीत २७६४.२० रुपयांप्रमाणे संपूर्ण एफआरपी अदा केल्याची माहिती कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.

कादवा कारखान्याने २०२३-२४ या गळीत हंगामात ३ लाख २९ हजार ५८२ टन उसाचे गाळप करत १२.२२ टक्के साखर उतारा मिळवत ४,००,१०० क्विंटल साखर निर्मिती केली. इथेनॉल निर्मितीला पेसो परवाना प्राप्त झाल्याने ३.६४ लाख इथेनॉल व ३६.७४ लाख लिटर स्पिरीट निर्मिती झाली.

या हंगामात कमी ऊस उपलब्धतेमुळे कमी गाळप झाल्याने साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे ऊस बिल अदा करण्यास अडचणी निर्माण झाल्या. अनेक कारखाने एफआरपी देऊ शकले नाहीत. मात्र कादवाने टप्प्याटप्प्याने ऊस बिलाची संपूर्ण रक्कम अदा केली आहे.

कादवाने आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू केली आहे. कार्यक्षेत्रामध्ये ३,४२४ हेक्टर, पेठ सुरगाणा ३४५ हेक्टर ऊस लागवड नोंद झाली असून, गेटकेनमधून २,९७३ हेक्टर ऊसलागवड नोंद झाली आहे. अशी एकूण ६,७४३ हेक्टर ऊस लागवडीची नोंद झाली आहे. तसेच कार्यक्षेत्र व गेटकेनमधून अजूनही नोंदी सुरू आहे.

पुरेशा प्रमाणात ऊसतोड कामगार भरती करण्यात आली आहे. ऊस लागवड वाढण्यासाठी कारखान्याकडून विविध ऊस विकास योजना राबविल्या जात आहेत. ऊस उत्पादकांना उधारीत कंपोस्ट खत तसेच रासायनिक खते उपलब्ध करून दिले आहे.

५३ व्या अधिमंडळाची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २७) दुपारी दोनला होत असून, सभेस सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही श्रीराम शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते, सर्व संचालक, प्र. कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले आहे.

शेअर्सची रकमेत वाढ

यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनचा वापर करत ऊस लागवड करावी. त्यासाठी कारखान्याकडून सहकार्य केले जाईल. शासनाने शेअर्सची रक्कम रु. १०,००० वरून १५,००० रुपये केली आहे. ज्यांचे शेअर्स दहा हजार आहेत, त्यांना २५ किलो, तर ज्यांचे शेअर्स पूर्ण होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Harvesting : सोयाबीनची उंची वाढली, उत्पन्न कमीच

Irrigation Subsidy : सिंचन अनुदान रखडल्याने आर्थिक संकट

Farmers Issue : कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नडला जातोय

Sangli APMC : व्यापारी, हमाल वादावर तोडगा काढण्यासाठी समिती

Nuksan Bharpai : १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टिचा मदत निधी

SCROLL FOR NEXT