MLA Suresh Dhas Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scam: घोटाळ्याची कागदपत्रे आमदार धस यांच्या ताब्यात

MLA Suresh Dhas: कापूस व सोयाबीन मूल्यसाखळी योजनेतील कथित ५०० कोटींच्या घोटाळ्याशी संबंधित चार हजार कागदपत्रे आमदार सुरेश धस यांच्या हाती आली आहेत. कृषी खात्यातील नियमबाह्य कारभार आणि वित्तीय गैरव्यवहार यावर आता धस यांनी प्रकाश टाकण्याची तयारी केली आहे.

मनोज कापडे

Pune News: कापूस व सोयाबीन मूल्यसाखळी योजनेत झालेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यांशी संबंधित तब्बल चार हजार कागदपत्रे आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आली आहेत. त्यामुळे कृषी खात्यातील संबंधित अधिकऱ्यांना घाम फुटला आहे.

मूल्यसाखळी योजनेची सर्व कागदपत्रे कृषी आयुक्तालय, कृषी सचिवालय, कृषिमंत्र्यांचे कार्यालय आणि कृषी उद्योग विकास महामंडळ अशा चार पातळ्यांवर तयार झालेली आहेत. योजनेतील गैरव्यवहाराची चर्चा गेल्या वर्षीपासून गाजते आहे. परंतु या चारही यंत्रणांच्या प्रमुखांनी चुप्पी साधली आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रे ताब्यात घेणारे आमदार धस आता नेमका काय अभ्यास करतात आणि काय निष्कर्ष काढतात, याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

सुरेश धस म्हणाले, की या योजनेत १०० टक्के नियमबाह्य काम झाले आहे. मात्र बेकायदा कामकाज कायद्यात बसविण्याचा प्रयत्न कृषी खात्यातील मंडळींनी केला आहे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही आणि पुरावे सापडले तर दोषी व्यक्तीला सोडत नाही. कोणी कितीही मोठा असला तरी शेतकऱ्यांच्या नावाखाली सरकारचा पैसा लुटणाऱ्याला मी सोडणार नाही.

त्यासाठीच आधी मी कागदपत्रे मागितली होती. सुरुवातीला कृषी अधिकाऱ्यांनी माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर मला माहिती देण्यात आली. याबाबत अभ्यास करणार असून थेट विधिमंडळ सभागृहातच काय बोलायचे ते बोलणार आहे. राज्याने अकारण ‘डीबीटी’मुक्त स्वतंत्र योजना आणली.

त्याद्वारे नॅनो डीएपी, नॅनो युरिया ही खते घाईघाईने खरेदी केली. या खतांची गुणवत्ता तपासण्यात आली नाही. शेतकऱ्यांची मागणी नसतानाही ही खते देण्यात आली; पण फवारण्यासाठी पुन्हा महागडे फवारणी पंप खरेदी केले. पंप खरेदीत कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले गेले, असेही श्री. धस म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Preparation: आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा: विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

Environment Campaign: सोलंकी यांची अनोखी हवामान जागृती यात्रा

Humani Bhunga Control: हुमणीच्या भुंगेऱ्यांना करा अटकाव

Interview with Rahul Mahiwal: ‘कृषी उद्योजक’ घडविणारी व्यवस्था आणू

PICNIC Farming Technology: ‘पिकनिक’ शेती, अर्थात निसर्गसिद्ध संजीवन शेती

SCROLL FOR NEXT