Agriculture Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : नागपूर विभागात कृषिपंपाच्या बिलात पाच कोटी रुपयांची सूट

Agriculture Pump : मागील वर्षी खरीप हंगामात कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने काही भागात दुष्काळ व दुष्काळ सदृश्यस्थिती जाहीर करीत कृषी पंपाच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला होता.

Team Agrowon

Nagpur News : मागील वर्षी खरीप हंगामात कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने काही भागात दुष्काळ व दुष्काळ सदृश्यस्थिती जाहीर करीत कृषी पंपाच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला होता. नागपूर विभागात वीज बिलात ५ कोटी ३ लाखांची सूट देण्यात आली आहे.

मागील वर्षी काही भागात अतिवृष्टी झाली, तर काही भागात पावसाचा मोठा खंड पडला. जून ते सप्टेंबर २०२३ या काळात ७५० मिमीपेक्षा व सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. राज्यातील १ हजार २१ महसूल मंडलांत दुष्काळ सदृश्यस्थिती जाहीर केली. यात नागपूर जिल्ह्यातील ११ महसूल मंडलांचा समावेश होता.

त्यानंतर पुन्हा पाच महसूल मंडलांचा समावेश करण्यात आला. या भागातील शेतकऱ्यांचा महसूल वसुलीत सूट, कर्जाचे पुनर्गठन, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३.५ टक्के सवलत, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला.

दुष्काळ सदृश्यस्थिती जाहीर करण्यात आलेल्या गावांमध्ये देण्यात आलेल्या सवलतीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. यात नागपूर विभागात २३ हजार ०३२ शेतकऱ्यांना वीज बिलात ३३.५ टक्के सवलतीचा लाभ देण्यात आला.

जिल्हा खातेदार एकूण वीज बिल रक्कम डिसेंबर महिन्यातील सूट मार्च महिन्यात दिलेली सूट एकूण सूट

नागपूर १६५७५ १६.३२ १.७८ २.१ ३.८८

वर्धा ४३४२ २.८ ०.५३ ०.४२ ०.९५

भंडारा २११५ १.३९ ०.१४ ०.३३ ०.४७

एकूण २३०३२ २०.५१ २.४५ २.८५ ५.३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT