Banana Market Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Market : दबावातील केळी दरात ३५० रुपये सुधारणा

Banana Rate : जळगाव जिल्ह्यात ८०० ते ९०० रुपये क्विंटल दर

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon Banana : जळगाव ः अनेक दिवसांपासून दबावात असलेल्या केळी दरात मंगळवारी (ता. ७) एक क्विंटलमागे ३५० रुपयांची सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात केळी दर ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल आहेत, तर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही कमाल दर १२९५ ते १३०० रुपये प्रतिक्विंटलवर पोचले आहेत.

केळी दरात मोठी घसरण मागील १८ ते २० दिवसांत झाली. महिनाभरापूर्वी दर्जेदार केळीस १३०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होते. परंतु अधिकची आवक व कमी उठाव यामुळे दरात सतत घसरण झाली. दर नीचांकी म्हणजेच ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. कमी दर्जाच्या केळीचे दर ४०० रुपये प्रतिक्विंटल होते. निर्यातीच्या केळीचे दरही ६०० ते ७०० रुपये होते.

केळी दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शेतकऱ्यांची मोठी वित्तीय हानी सुरू झाली. या स्थितीत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. परंतु रावेर, चोपडा आदी बाजार समित्या बघ्याची भूमिका घेत होत्या. अशात जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसार यांनी व्यापारी, खरेदीदार, शेतकरी आदींची बैठक घेऊन त्यात खरेदीदारांना तंबी दिली. केळीची खरेदी, विक्री आदींबाबत व्यापाऱ्यांची दप्तर तपासणी करा, असे आदेश दिले.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली व केळी दरांबाबत प्रशासनाने हस्तक्षेप करण्याची सूचना केली. यानुसार बऱ्हाणपूर येथील बाजारात जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत लिलाव सुरू झाले. तर जिल्ह्यातही केळी दर ४०० ते ५०० रुपयांवरून कमाल ९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. बऱ्हाणपूरच्या बाजारात मंगळवारी (ता. ७) ६४ ट्रक केळी विक्रीसाठी आली होती. यातील कमाल गाड्यांमधील केळीचे लिलाव झाले. तेथे कमाल दर १२९५ रुपये मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांची कर्जमाफी पहिल्या कॅबिनेटमध्येच जाहीर करा; राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची मागणी

Sugarcane Season 2024 : कृष्णा कारखान्याचे १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Rabi Season 2024 : सिंधुदुर्गात रब्बी हंगामाला प्रारंभ; मशागतीला वेग

Rabi Season 2024 : सातारा जिल्ह्यात रब्‍बी पिकांच्या पेरणीस वेग

SCROLL FOR NEXT