Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Price Hike: चाऱ्याचे वाढते दर शेतकऱ्यांना महागात; दूध व्यवसाय संकटात!

Farmer Issue: दौंड तालुक्यातील साखर कारखाने बंद झाल्यामुळे उसाच्या वाड्यांची विक्री बंद झाली आहे. जनावरांच्या इतर चाऱ्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Team Agrowon

Pune News: दौंड तालुक्यातील साखर कारखाने बंद झाल्यामुळे उसाच्या वाड्यांची विक्री बंद झाली आहे. जनावरांच्या इतर चाऱ्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कारखाने सुरू झाल्यानंतर उसाची तोड मोठ्या प्रमाणात सर्वत्र सुरू असते. यामुळे उसाचे वाढे जनावरांसाठी माफक दरात उपलब्ध होते. तसेच इतर चाऱ्यांचेही दरही प्रमाणात राहतात. वाड्यांमुळे दूध उत्पादकांना चार ते पाच महिने दिलासा मिळतो. परंतु सध्या दौंड तालुक्यातील व बाहेरील सर्व साखर कारखाने बंद झाले आहेत.

यामुळे जनावरांना चाऱ्यासाठी लागणारा मका, उसाचे वाडे या चाऱ्यांच्या दरात वाढ झाली आहे. एकीकडे मार्च महिना येऊनही दुधाला अपेक्षित असा दर मिळत नाही. तसेच दुसरीकडे विक्रीसाठीही दुभत्या जनावरांना (गायी) भाव मिळत नाही.

गोळीपेंड, शेंगदाणापेंड, सरकी, भुसा यांचे भाव मात्र वाढलेले आहेत. एकंदरीत अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. जनावरांचे संगोपन करावे तरी कसे? असा मोठा प्रश्न सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

जनावरांच्या चाऱ्याचे सध्या असलेले दर

चारा सध्याचा दर (रू.)

ऊस ३३०० ते ३५०० (प्रतिटन)

मका १२०० ते १५०० (प्रतिगुंठा)

ऊस वाढे २००० ते २२०० (प्रतिटन)

मुरघास ३५० (५० किलो बॅग)

सध्या उसाचे वाढे बंद झाल्यामुळे इतर चाऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यात दुधालाही समाधानकारक भाव मिळत नसल्याने दूध व्यवसाय मोडकळीस आला आहे.
सतीश कोल्हे, दूध उत्पादक शेतकरी, देऊळगाव राजे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT