Kolhapur rain agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain : नद्यांसह धरणांच्या पाणी पातळीत वाढ परंतु बळीराजा अद्यापही चिंतेत

Farmers Worried : जूनचा शेवटचा आठवडा आला तरी अद्याप पावसाने म्हणावा असा जोर धरलेला नाही. यामुळे खरिपाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसात कमी झालेल्या पावसाने घाट माथ्यावर जोर घेण्यास सुरूवात केली आहे. आज दिवसभरात पावसाची उघडझाप सुरू राहिली. दिवसभर ढगाळ वातावरण व थांबून थांबून पाऊस असे चित्र पाहायला मिळाले. काही काळ सूर्यदर्शनही झाले.

जूनचा शेवटचा आठवडा आला तरी अद्याप पावसाने म्हणावा असा जोर धरलेला नाही. यामुळे खरिपाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

धरणाची पाणीपातळी वाढली २ फुटाने

राधानगरी तालुक्यात पावसाने दमदार सुरुवात केली. २४ तासांत राधानगरी धरण स्थळावर १६० मिलिमीटर, तर एक जूनपासून आजअखेर ४७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एका दिवसात धरण पाणीपातळी २ फुटाने वाढली आहे. कालच्या तुलनेत आज पाऊस कमी होता.

काळम्मावाडी धरण क्षेत्रात १०७ मिलिमीटर पाऊस झाला, तर एकूण २५३ मिलिमीटर पाऊस झाला. याची पाणीपातळी अर्धा मीटरने वाढली आहे. दाजीपूर अभयारण्य परिसरात १८० मिलिमीटर पाऊस झाला. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.

जिल्ह्यातील धरणसाठा टीएमसीमध्ये

राधानगरी २.२८, तुळशी १.२९, वारणा १०.८७, दूधगंगा ३.५३, कासारी ०.७८, कडवी १.२१, कुंभी ०.८७, पाटगाव १.२९, चिकोत्रा ०.५०, चित्री ०.५०, जंगमहट्टी ०.४१, घटप्रभा ०.९९, जांबरे ०.३५, आंबेआहोळ ०.८८ व कोदे लघु प्रकल्प ०.०३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी फुटात पुढीलप्रमाणे, राजाराम १३.५, सुर्वे १६, रुई ४०.६, तेरवाड ३६.६, शिरोळ २८, नृसिंहवाडी २२, राजापूर ११ तर नजीकच्या सांगली ७.९ व अंकली ८.६ अशी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT