Rice Seed
Rice Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Seed : भात बियाणे वेळेपूर्वीच उपलब्ध

Team Agrowon

Rice Sowing Update : रायगड जिल्ह्यात मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना आता भातपेरणीचे वेध लागले आहेत. पेरणीच्या कामे वेळेत व्हावी, यासाठी महाड तालुक्यातील दुकानांत भात बियाणे वेळेपूर्वीच उपलब्ध झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

बियाणे व इतर शेती विषयक खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या वर्षी भात बियाण्याच्या दरात जुजबी, ५ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे.

जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावर भातपीक लागवड करण्यात येते. यापैकी महाड तालुक्यात तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक लागवड होते. या वर्षी वेळेत बियाणे उपलब्‍ध झाल्याने बियाणे खरेदीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भात बियाण्याचा पुरवठा तालुक्यातील परवानाधारक विक्रेत्यांकडे झाला आहे. भात बियाण्यामध्ये महाबीज व खासगी कंपनीचे संकरित व सुधारित भात बियाणे असे एकूण ४७ टन बियाणे सध्या विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.

यात महाबीजचे सुवर्णा ३७.०५ टन, श्रीराम ४ टन, दापोली कृषी रत्नागिरी ८ चा १.४ टन व कर्जत २ चा ३.५५ टन तसेच खासगी कंपनीच्या संपदा बियाणांचा १ टन असा ४७ टन पुरवठा करण्यात आला आहे. मान्यताप्राप्त परवानाधारक विक्रेत्यांकडे बियाणे विक्रीस उपलब्‍ध असून शेतकऱ्यांनी खरेदीसाठी लगबग सुरू आहे.

तालुक्यात हळवा, निमगरवा व गरवा या प्रकारातील बियाणांची लागवड होत असल्याने तशी बियाणे बाजारात आली आहेत. पारंपरिक सुवर्णा, जया, कर्जत, मसुरी, कर्जत-२ रत्नागिरी तर खासगी कंपन्यांची चिंटू, साईराम, ज्योतिका, कोमल, सोनम, वैष्णवी, पूजा, शुभांगी इत्‍यादी सुधारित व संकरित जातीची बियाणे विक्रीस उपलब्ध आहेत.

बियाण्यांचे दर रु.

सुवर्णा - १४०० (२५ किलो)

जया - १४०० (२५ किलो)

जोरदार - १२०० (१० किलो)

सोनम गोल्ड - ११५० (१० किलो)

साईराम - १४०० (१० किलो)

चिंटू - १४०० (१० किलो)

यंदा बियाणे वेळेत आल्याने शेतकरी वेळेत खरेदी करून भातपेरणी करू शकतील. महाबीजप्रमाणे अनेक खासगी कंपन्यांची बियाणे या वर्षी उपलब्ध आहेत. पारंपरिक बियाण्याबरोबरच आता शेतकरी नवीन बियाण्याकडेही वळत आहेत.
नागेश मोरे, बियाणे विक्रेता, महाड
महाड तालुक्यात सध्या महाबीज, विद्यापीठ व खासगी कंपन्यांची ४७ टन बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी बियाणांची वेळेत खरेदी करून गैरसोय टाळावी. आणि भातपेरणी वेळेत करावी.
प्रकाश सरतापे, कृषी विस्तार अधिकारी, महाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT