Milk Powder  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Powder Import : दूध भुकटी आयातीचा निर्णय रद्द करा

Dairy Business : केंद्र शासनाने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदच पवार यांच्याकडे करण्यात आली.

Team Agrowon

Kolhapur News : केंद्र शासनाने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदच पवार यांच्याकडे करण्यात आली. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी यासंदर्भात पवार यांना निवेदन दिले.

निवेदनामध्ये म्हटले आहे, की, राज्यामध्ये हजारो टन दूध पावडर शिल्लक असताना केंद्र सरकारने आयात शुल्क कमी करून दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याची परवानगी दिली आहे. हा निर्णय दूध उत्पादक व दूध संघ यांचे कंबरडे मोडणारा आहे.

अगोदरच दूध पावडरचे दर हे उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाले आहेत. त्यातच हा निर्णय झाल्याने दूध पावडरचे दर आणखी कमी होणार आहेत. राज्यात अतिरिक्त गायीच्या दुधाचा प्रश्न निर्माण झाला असून गाय दुधाचे दर २७ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

दूध पावडरला अपेक्षित दर मिळत नसल्याने दूध संघांना अतिरिक्त दुधापासून तयार होणाऱ्या दूध पावडरचा साठा करून ठेवावा लागत आहे. आज देशात जवळपास २ लाख टन तर महाराष्ट्रात २० हजार टन दूध पावडर शिल्लक आहे.

वरील वस्तुस्थिती लक्षात न घेता केंद्र सरकारने आयात शुल्क कमी करून दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय दुग्ध व्यवसायाला मारक असून दूध दरावर थेट परिणाम करणारा आहे. त्यामुळ दूध पावडर आयात करण्याचा निर्णय रद्द करण्याबाबत शरद पवार यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT