Mazi Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Majhi Ladki Bahin : ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

Women Empowerment : विभागीय आयुक्त कार्यालयात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत शुक्रवारी (ता. १२) विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आढावा घेतला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : विभागीय आयुक्त कार्यालयात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत शुक्रवारी (ता. १२) विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आढावा घेतला. या वेळी श्री. गावडे म्हणाले, की राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना संपूर्ण राज्यात सुरू केली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विभागात सर्वत्र नाव नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी महिलांचा प्रतिसाद दिसून येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखल्यांसाठी महिलांना सहकार्य करावे तसेच विभागातील प्रत्येक जिल्ह्यात योजनेची पारदर्शक व गतिमान अंमलबजावणी करावी.

योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास याबाबतची तक्रार आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी.

योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीत त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार, असल्याचे विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले. योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून देण्याचे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी उपायुक्त सुरेश बेदमुथा, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त देविदास टेकाळे, महिला व बाल विकास विभागाचे प्रभारी उपायुक्त गणेश पुंगळे उपस्थित होते. योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. महिलांना नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे. महिलांची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना श्री. गावडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT