Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : पीककर्ज वाटपाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Agriculture Credit : जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८८ हजार शेतकऱ्यांना एक हजार ९३६ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८८ हजार शेतकऱ्यांना एक हजार ९३६ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ज्या बँकांचे कर्जवाटपाचे प्रमाण अद्यापही कमी आहे. त्यांनी येत्या आठवड्यात वाटपाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

येथील महसूल भवनात गुरुवारी (ता.२८) झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आशिया यांनी जिल्हास्तरीय बँकर्स समितीचा आढावा घेतला.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, रिझर्व बँकेचे अग्रणी बँकेचे प्रबंधक राजकुमार जयस्वाल, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दीपक पेंदाम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश निकम, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) नानासाहेब चव्हाण, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक अमर गजभिये, ‘माविम’चे जिल्हा समन्वयक रंजन वानखडे यांच्यासह विविध विभाग व बँकांचे जिल्हा समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी आशिया यांनी पीककर्जासह विविध योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जांचा विभाग व बँकनिहाय आढावा घेतला. केंद्र शासनाच्या वतीने विविध सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

बँकांनी आपल्या क्षेत्रातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ दिला पाहिजे. यासाठी आवश्यकता भासल्यास बँकस्तरावर विशेष शिबिरे घेतली जावीत, कर्ज प्रकरणात लाभार्थ्यांकडून आलेल्या तक्रारींवर सात दिवसांच्या आत कारवाई करण्याचे निर्देशदेखील दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT