IAS Kumar Ashirwad Agrowon
ॲग्रो विशेष

IAS Kumar Ashirwad : महसूल, पोलीस विभागाने परस्पर समन्वय ठेवावा

Election Update : आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व सहायक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी व पोलीस विभाग यांच्यात परस्पर चांगला समन्वय असला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

Team Agrowon

Solapur News : आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व सहायक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी व पोलीस विभाग यांच्यात परस्पर चांगला समन्वय असला पाहिजे, हाच समन्वय निवडणूक यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा, असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी (ता.१४) केले.

सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, पोलीस उप आयुक्त अजित बिऱ्हाडे, मनपा उपायुक्त निखिल मोरे, सर्व सहायक निवडणूक अधिकारी, पोलीस अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, की जिल्ह्यात एकूण ३ हजार ५९९ मतदान केंद्र असून, मागील लोकसभा निवडणुकीमध्ये एकही व्हलनेरबेल मतदान केंद्र नव्हते. यावेळी अशा मतदान केंद्राबाबत महसूल व पोलीस विभागाने निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तपासणी करावी व त्याची यादी तयार करून ठेवावी.

तसेच प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने कलम १०७, ११० च्या प्रलंबित केसेस त्वरित निकाली काढाव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या. सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकारी, सहायक निवडणूक

अधिकारी व विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवडणुकीत त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपल्या जबाबदारी विषयी माहिती घेऊन त्या पद्धतीने व्यवस्थितपणे कामकाज करावे. असे त्यांनी सूचित केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT