Cabinet Meeting  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture University : कृषी विद्यापीठांमधील प्राध्यापकांचे निवृत्ती वय ६०

Agriculture News : कृषी विद्यापीठांमधील अध्यापक वर्गाच्या निवृत्तीचे वय आता ६० वर्षे करण्यात आले आहे.

मनोज कापडे

Pune News : कृषी विद्यापीठांमधील अध्यापक वर्गाच्या निवृत्तीचे वय आता ६० वर्षे करण्यात आले आहे. यामुळे निवृत्ती वयाबाबत गेल्या काही वर्षांपासून असलेला वाद संपुष्टात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी (ता. ५) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापकांचा निवृत्ती अवधी दोन वर्षांनी घटविण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत, असे वृत्त ‘अॅग्रोवन’ने यापूर्वीच प्रसिद्ध केले होते. निवृत्ती अवधीचा अभ्यास करण्याच्या लेखी सूचना कृषी खात्याने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे तत्कालीन महासंचालक विश्वजीत माने यांना दिल्यानंतर या संदर्भातील घडामोडींना वेग आला होता. तथापि, महासंचालकांचा अहवाल अनेक दिवस धुळ खात पडला होता.

‘‘निवृत्तीची मर्यादा कमी केल्यास पदे लवकर रिक्त होतील व त्यातून नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल. मात्र, जुनी प्राध्यापक मंडळी या निर्णयामुळे अस्वस्थ आहेत. जुन्या प्राध्यापकांना लवकर निवृत्ती केल्यास नवतंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेल्या युवा शास्त्रज्ञांना संधी मिळू शकते. कृषी विद्यापीठांमधील मनुष्यबळ विकासाला यामुळे चालना मिळेल,’’ असे एका कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवाने सांगितले.

वयोमर्यादा कमी केल्यामुळे विद्यापीठांमधील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक, अधिष्ठाता, संचालक अशा महत्त्वाच्या पदांवरील नव्या भरतीला चालना मिळेल. या पदांची सध्याची निवृत्ती वयोमर्यादा सध्या ६२ आहे. ही वयोमर्यादा दोन वर्षांनी कमी केल्यामुळे राज्य शासनाला तत्काळ काही वाढीव खर्च करावा लागेल. निवृत्तिवेतनापोटी जादा निधी अदा करावा लागेल. अर्थात, त्याचा अभ्यास झाला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

जाणकार प्राध्यापक काय म्हणतात...

निवृत्तीचे वय कमी केल्यामुळे अनुभवी प्राध्यापकांना लवकर सेवा सोडावी लागेल. त्याचा कृषी शिक्षण व संशोधनावर परिणाम होईल, असे एका शिक्षण संचालकाने सांगितले. परंतु, विद्यापीठांमधील काही जाणकार प्राध्यापकांना हा युक्तिवाद मान्य नाही. वयोमर्यादा कमी करण्याचा निर्णय जुन्या व प्रस्थापित अध्यापकांना आवडलेला नाही.

मात्र, खरोखर संशोधन व अध्यापनाची कौशल्ये असल्यास राज्यातील १६५ खासगी महाविद्यालये तसेच इतर कृषी संशोधन संस्थांमध्ये संधी मिळू शकते. वयोमर्यादा कमी केल्यामुळे राज्यातील उच्चशिक्षित वर्गाला संधी मिळतील. तसेच, नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यास अनुकूल स्थिती प्राप्त होईल, असे काही जाणकार प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT