Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Cold Storage Subsidy : शीत भांडारांवरील बंद अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील

Ajit Pawar : केंद्र सरकारने शीत भांडारांवरील बंद केलेले अनुदान वितरण पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासंबंधित असलेले प्रश्न तातडीने सोडविले जातील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Team Agrowon

Pune News : द्राक्ष निर्यातीसाठी येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्याबरोबरच केंद्र सरकारने शीत भांडारांवरील बंद केलेले अनुदान वितरण पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासंबंधित असलेले प्रश्न तातडीने सोडविले जातील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. नारायणगाव (ता.जुन्नर) येथील हस्ताई शेतकरी उत्पादक कंपनीच्या एकात्मिक शीतगृह आणि पॅक हाउसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, जलजीवन मिशनचे उप विभागीय अभियंता इकलाक शेख, उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे, तहसीलदार रवींद्र सबनीस, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, गणेश वाघ, महादेव वाघ उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘बांगलादेशने द्राक्ष आयातीवर अतिरिक्त कर लावले आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्या देशात द्राक्ष निर्यात करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्या अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रश्नही केंद्रीय गृहमंत्री व वाणिज्य मंत्री यांच्याशी चर्चा करून सोडविण्यात येतील. केंद्र सरकार रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, विमान, या क्षेत्रांत मोठी गुंतवणूक करत असून त्या माध्यमातून रोजगाराची संधी निर्मिती होत आहे. केंद्र सरकारने शीत भांडारांवरील बंद केलेले अनुदान वितरण पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील,’’ असे आश्‍वासन श्री. पवार यांनी या वेळी दिले.

चिल्हेवाडी बंदिस्त पाइपलाइन प्रकल्पाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चिल्हेवाडी येथील बंदिस्त पाइपलाइन प्रकल्पाचा उर्वरित टप्पा क्र.१ व २ कामाचे व जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत २२ गावांना पाणीपुरवठा करणारी बेल्हे प्रादेशिक योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT