Animal Husbandry Department  Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry Department : ‘पशुसंवर्धन’च्या पुनर्रचेनतून आरोग्यसेवांचा दर्जा उंचावेल

Dairy Business : पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे एकत्रीकरण करून या दोन्ही विभागांची पुनर्रचना करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला.

Team Agrowon

Nagpur News : पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे एकत्रीकरण करून या दोन्ही विभागांची पुनर्रचना करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. या माध्यमातून पशू आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासोबतच भारतीय पशुवैद्यक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्‍वास महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्या वतीने व्यक्‍त करण्यात आला आहे.

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे एकत्रीकरण, राज्यातील सर्व २८४१ श्रेणी-दोन दवाखान्याचे श्रेणीत दर्जावाढ करून त्यांचा श्रेणी-१ मध्ये समावेश, गावागावांत उत्कृष्ट व गुणवत्तापूर्वक पशुवैद्यकीय सुविधा, कृत्रिम रेतनाचा दर्जा सुधारण्यासाठी ब्रोव्हाईन ब्रीडिंग ॲक्‍ट, आनुवंशिक सुधारणा करण्यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, पशुखाद्याचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना, रोग निदानासाठी प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण,

३१७ तालुका पशुचिकित्सालयांची स्थापना, ३५१ तालुका पशुवैद्यकीय व दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालये स्थापण्यास मान्यता, सर्व कार्यालयांची राज्यभर एकस्तर रचना, सर्व दवाखान्यांमध्ये एक पदवीधर व एक पदविकाधारक पशुवैद्यक पदांना मंजुरी, राज्यात आठ ठिकाणी विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळांना मंजुरी,

जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्‍त व दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्यावर नियंत्रण, लम्पी रोगाविरोधात लस उत्पादन कारखान्यास पुणे येथे परवानगी,

देशातील पहिलाच लस उत्पादनाचा शासकीय कारखाना असे अनेक निर्णय प्रस्तावीत सुधारणांतर्गत घेण्यात आले आहेत. त्यातून पशुवैद्यकांचे व्यापक हित जपले जाईल, असा विश्‍वास महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्या वतीने व्यक्‍त करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Banana Cultivation: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंदांच्या मागणीत वाढ

Khandesh Tur Lagwad: खानदेशात यंदा तूर लागवड स्थिर राहण्याचे संकेत

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

SCROLL FOR NEXT