Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : परभणीत कृषी विभागाची धुरा तरुण अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

Agriculture News : परभणी जिल्ह्यात सद्यःस्थितीत कृषी विभागाची धुरा वयाची तिशी-चाळिशीच्या आतील नव्या उमेदीच्या तरुण अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात सद्यःस्थितीत कृषी विभागाची धुरा वयाची तिशी-चाळिशीच्या आतील नव्या उमेदीच्या तरुण अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आली आहे. परिणामी, शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल. कामाचा उरक वाढेल. कृषी विभागाचा गाडा वेगाने रेटला जाईल. तरुण शेतकरी व शेतीची प्रगती गतीमान होईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.

मार्च महिन्यात परभणीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी अनिल गवळी यांची नियुक्ती झाली. चाळीच्या आत वय असलेले गवळी हे आजवरचे सर्वांत तरुण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत. प्रथमच नियुक्ती झालेले अधिकारी वयाच्या तिशीच्या आतील आहेत.

त्यात जिल्हा कृषी उपसंचालक स्वप्नील जाधवर, तंत्रअधिकारी (सांख्यकी) पूजा थिटे, तंत्राधिकारी (पाणलोट) नूतन जाधव, स्मार्टचे अंतर्गत मूल्य साखळी तज्ज्ञ-कृषी सल्लागार शुभम उपरलवाड, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक अभिषेक घोडके, झेडपीच्या कृषी विभागात जिल्हा कृषी अधिकरी वर्ग-१ पदी केशव सूर्यवंशी, शुभांगी शिंदे, अमृता तोडकर यांची प्रथमच नवीन नियुक्ती झाली आहे.

याशिवाय तंत्राधिकारी (फलोत्पादन) बाळासाहेब गाढवे, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे (परभणी), तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख (पालम) यांच्यासह कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक हे देखील चाळीसच्या आतील आहेत.

जिल्हा कृषी विभागाचे नेतृत्व करणारे जिल्हा अधीक्षक अनिल गवळी यांच्या मदतीला तरुण, उमद्या अधिकाऱ्यांची फौज आहे. जुने जाणते अनुभवी अधिकारी तसेच नव्या दमाचे तरुण अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व स्तरांतील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचतील. कामाचा निपटारा जलद गतीने होऊन शेतकऱ्यांच्या प्रगतीला दिशा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT