Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC: शेतीमालाच्या संगणकीय आवक नोंदीचा अहवाल द्या

Cess Collection Issue: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोट्यवधीची सेस चोरी रोखण्यासाठी गेल्या २०१५ पासून सुरू असलेली नोंद ठप्प झाली आहे.

गणेश कोरे

Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोट्यवधीची सेस चोरी रोखण्यासाठी गेल्या २०१५ पासून सुरू असलेली नोंद ठप्प झाली आहे. एका संचालकाच्या अनुभवी कार्यकर्त्याला काम देण्याच्या खटाटोपीत ही सेवा ठप्प झाल्याने बाजार समितीच्या सेस संकलनावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी प्रशासकीय हेव्यादाव्यांमुळे देखील आवक नोंद बंद असून, बाजार समितीच्या सुमारे १८ कोटींच्या नुकसानीची चर्चा बाजार आवारात आहे.

बाजार समितीमध्ये आवक होणाऱ्या शेतीमालाची संगणकीय नोंदीद्वारे सेस संकलन वाढीचे प्रयत्न सुरू होते. २०१५ पासून एक एजन्सी कार्यरत होती. मात्र संचालक मंडळ आल्यानंतर एका संचालकाच्या अननुभवी कार्यकर्त्याला काम देण्याचा खटाटोप सुरू आहे. या प्रकरणी कार्यरत असणाऱ्या एजन्सीने पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागितली. यावर पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधकांनी संगणकीय शेतीमाल नोंदीची एजन्सी बदलताना, ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश बाजार समितीला दिले.

ही प्रक्रिया जोपर्यंत पार पडत नाही तोपर्यंत सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या एजन्सीकडून काम करून घेण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. मात्र बाजार समितीने पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कार्यरत असणाऱ्या एजन्सीचे काम रद्द केले आणि बाजार समिती कर्मचाऱ्यांकडून संगणकीय आवक नोंद होत असल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात १ एप्रिलपासून संगणकीय आवक नोंदी बंद असल्याचे समजते.

दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीला खरमरीत पत्र देऊन, नवीन ठेकेदारीची नियुक्ती होईपर्यंत काम करण्याच्या सूचना बाजार समितीने सद्यःस्थितीत कार्यरत असणाऱ्या स्टर्लिंग सिस्टिमला देण्यात आल्या आहेत का, आवक नोंदीचे काम दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात आले आहे का, ई निविदा कार्यवाही सुरू आहे का, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सेस चोरीसाठी आंब्याची आवक नोंद नाही?

सध्या आंब्याचा हंगाम जोमात आला आहे. आंब्याच्या माध्यमातून मोठा सेस बाजार समितीला मिळत आहे. मात्र सध्या संगणकीय आवक नोंद होत नसल्याने आंब्याची सेस चोरी मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका आहे.

जिल्हा उपनिबंधकांचे पत्र बाजार समितीला मिळाले आहे. त्यानुसार अहवाल सादर केला जाईल. संगणकीय आवक नोंदीबाबत उपसमितीने अटी, शर्तींचा मसुदा संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर ई-टेंडर प्रक्रिया राबविली जाईल. तोपर्यंत बाजार समितीचे कर्मचारी संगणकीय आवक नोंद घेत आहेत.
आर. एस. धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT