Dishi Govansh Agrowon
ॲग्रो विशेष

Govansh Hatya Bandi : ‘गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा’

Latest Agriculture News : गोवंश हत्या बंदी विरोधात आणि गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कुरेशी समाजावर अन्याय व अत्याचार केला जात असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.२२) ऑल इंडिया जमीयतुल कुरेशी ॲक्शन कमिटी आणि शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Pune News : गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा आणि ब्रिटिशकालीन कत्तलखाने पुन्हा सुरू करावेत, जनावरांची कायदेशीर वाहतूक केली जात असताना गुंडाकडून होणारा अत्याचार थांबविण्यासाठी सरकारने पावले उचलावीत आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातील कुरेशी समाजासह शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

गोवंश हत्या बंदी विरोधात आणि गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कुरेशी समाजावर अन्याय व अत्याचार केला जात असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.२२) ऑल इंडिया जमीयतुल कुरेशी ॲक्शन कमिटी आणि शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना कुरेशी समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात ऑल इंडिया जमियतुल कुरेशी ॲक्शन कमिटीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी, शहराध्यक्ष हसन कुरेशी, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजी नांदखिले, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी,

माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण, वंचित आघाडीचे अध्यक्ष मुनवर कुरेशी, भीम आर्मीचे अध्यक्ष दत्ता पोळ, लहूजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हतागळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, अंजूमभाई इनामदार आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT