Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Rozwa Irrigation Project : रोझवा लघुसिंचन प्रकल्पाची दुरुस्ती सुरू

शेतकऱ्यांची मागणी उशिरा का होईना पण मान्य करण्यात आली असून, पाटबंधारे विभागाकडून रोझवा लघुसिंचन प्रकल्पाच्या साडव्यामधून होणारी गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Team Agrowon

Nandurbar News : तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या कोठार येथील रोझवा लघुसिंचन प्रकल्पाच्या सांडव्याच्या दुरुस्तीला पाटबंधारे विभागाकडून (irrigation Department) अखेर सुरवात करण्यात आली. यासाठी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण काम होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन गावाच्या पुढे कोठार गावाजवळ रोझवा लघुसिंचन प्रकल्पाची निर्मिती पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेली आहे.

या प्रकल्पाची जलसाठ्याची क्षमता एकूण १.७४ दशलक्ष घनमीटर आहे. दर वर्षी पावसाळ्यात या लघुसिंचन प्रकल्पात पूर्ण क्षमतेने साठा होत असतो. मात्र लघुसिंचन प्रकल्पाच्या सांडव्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने भिंतीमधून पाण्याची मोठी गळती लागलेली असते.

यामुळे या प्रकल्पातील साठा फारच अल्पजीवी ठरत होता आणि दररोज प्रकल्पातून होणाऱ्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाहून जायचे. पूर्ण क्षमतेने भरलेला हा लघुसिंचन प्रकल्प उन्हाळ्याच्या सुरवातीलाच म्हणजे मार्च महिन्यात पूर्णपणे कोरडाठाक झाल्याचा अनुभव दर वर्षी शेतकऱ्यांना येत होता.

त्यामुळे लघुसिंचन प्रकल्पाची दुरुस्ती करण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.

शेतकऱ्यांची मागणी उशिरा का होईना पण मान्य करण्यात आली असून, पाटबंधारे विभागाकडून रोझवा लघुसिंचन प्रकल्पाच्या साडव्यामधून होणारी गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

यासाठी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ठेकेदाराकडून कामाला सुरवात करण्यात आली आहे. सांडव्याच्या आतील बाजूला दुरुस्तीअंतर्गत काँकिटचे जॅकेटिंग करण्यात येत आहे, तर सांडव्याच्या आतील बाजूला काँक्रिटची एक मोठी भिंत उभारण्यात येत आहे.

जवळपास निम्म्यापेक्षा अधिक दुरुस्तीचे काम झालेले असून, पुढील आठवड्यापर्यंत काम पूर्णत्वास येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, रोझवा लघुसिंचन प्रकल्पाप्रमाणेच पाडळपूर, गढावली, सिंगसपूर या प्रकल्पांचीदेखील दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.

गुणवत्तापूर्ण कामाची अपेक्षा

रोझवा लघुसिंचन प्रकल्पतील जलसाठा, पाण्याचा अपव्यय व दुरुस्ती हा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या शेतकरी बांधवांचा जिवाळ्याच्या विषय आहे. अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग येऊन जलसिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्यामुळे सांडव्याची दुरुस्ती होत असताना ठेकेदाराने इस्टिमेटनुसार गुणवत्तापूर्ण काम करावे, अशी अपेक्षा रिसरातील शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT