Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department: कृषिमंत्र्यांनी मान्यता दिलेल्या बदल्यांचे आदेश काढा

Employee Transfer Order: राज्याच्या विविध भागांतील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांना कृषिमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे मान्यता दिलेल्या बदल्यांचे अंतिम आदेश जारी करा, अशी सूचना कृषी आयुक्तालयाला करण्यात आली आहे.

मनोज कापडे

Pune News: राज्याच्या विविध भागांतील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांना कृषिमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे मान्यता दिलेल्या बदल्यांचे अंतिम आदेश जारी करा, अशी सूचना कृषी आयुक्तालयाला करण्यात आली आहे.

राज्याच्या कृषी मंत्रालयातील अवर सचिव प्रशांत पिंपळे यांनी कृषी आयुक्तांना एक पत्र पाठवून ही सूचना केली आहेत. बदली अधिनियमनातील कलम ४(५)मधील तरतुदीनुसार लघुलेखक, लिपिक, सहायक अधीक्षक, कृषी सहायक व अधीक्षकांच्या विनंती बदल्या किंवा मुदतपूर्व बदल्यांचे अधिकार सक्षम बदली प्राधिकाऱ्याला देण्यात आले आहेत. या प्रकरणात कृषिमंत्रीच असा प्राधिकारी आहेत. या बदल्यांना मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे बदलीचे आदेश तत्काळ जारी करावेत, असे अवर सचिवाने सांगितले आहे.

आयुक्तालयाला बदल्यांबाबत सूचना देत असताना काहीशी सावध भूमिकादेखील मंत्रालयाने घेतली आहे. ‘संबंधित कर्मचाऱ्यांनी बदलीने मागणी केलेले पद रिक्त आहे की नाही याची खात्री करा आणि त्यानंतरच बदल्यांचे आदेश काढा,’ असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ‘जागा रिक्त नसल्यास विभागीय कृषी सहसंचालकाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून विकल्प घ्यावा व त्यानंतरच बदली आदेश काढावेत,’ असे मंत्रालयाने सूचवले आहे.

बदलीचा दुसरा आदेश काढू नका

मंत्रालयातून आलेल्या लेखी सूचनेची दखल घेत आयुक्तालयाने विभागीय कृषी सहसंचालकाने स्वतंत्र आदेश जारी केले आहेत. ‘‘बदल्यांचे आदेश तातडीने जारी करा. पद रिक्त नसल्यास विकल्प घ्या.

मात्र विकल्पाचे पद पूर्णतः रिक्त हवे. कोणत्याही स्थितीत भविष्यात पदोन्नतीने किंवा निवृत्तीने होणाऱ्या रिक्त पदावर पदस्थापना देऊ नका. तसेच आंतरसंभागीय बदलीस मान्यता प्राप्त झाली असल्यास त्याबाबत बदलीचा दुसरा आदेश काढू नका,’’ असे कृषी आयुक्तालयाचे बजावले आहे. तसे पत्र प्रशासकीय अधिकारी अखिल शेंडे यांनी राज्यातील विभागीय कृषी सहसंचालकांना पाठवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT