MSRTC Agrowon
ॲग्रो विशेष

MSRTC: एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका काढा : परिवहन मंत्री सरनाईक

Pratap Sarnaik: एसटी महामंडळाच्या आर्थिक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले आहेत. कर्मचारी सुविधा, देणी, खर्च व उत्पन्न यांचा स्पष्ट लेखाजोखा तयार होणार आहे.

Team Agrowon

Mumbai News: ‘‘एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसेच भविष्यातील नियोजन करण्यासाठी एक आर्थिक श्वेतपत्रिका काढा,’’ असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला सोमवारी (ता.२८) दिले.

एसटीच्या मुख्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांचे सह सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते.

सुमारे १० हजार कोटी संचित तोटा सहन करणाऱ्या एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकाचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागत असल्याचा मुद्दा बैठकीत समोर आला. कर्मचाऱ्यांचे देणी, भविष्य निर्वाह निधीचे हप्ते, कामगार करारातील प्रलंबित देणी यासाठी महामंडळाला पैशाची गरज आहे.

याबरोबरच महामंडळाला इंधन, वस्तू व सेवा पुरविणाऱ्या संस्थांची थकीत देणी या सर्व घटकांचा विचार करून एसटी महामंडळाला सध्या किती उत्पन्न मिळते, किती खर्च येतो, तसेच किती देणी बाकी आहेत. या सर्वांचा लेखा-जोखा मांडणारी एक श्वेतपत्रिका काढणे अत्यंत आवश्यक असून त्यातून एक आर्थिक शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी श्वेतपत्रिका काढा, असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वासित केल्याप्रमाणे १३१० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या एकूण प्रकरणाची चौकशी तटस्थ व्यक्तीमार्फत केली जाईल, तशा सूचना अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) यांना देण्यात येतील, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला महत्त्वाचा असून अशा तज्ज्ञांना एसटी महामंडळाच्या प्रशासनाला मार्गदर्शन करण्यासाठी नेमले जावे, अशा सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बैठकीत दिल्या. त्यानुसार बांधकाम, वाहतूक, कामगार, आर्थिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी प्रत्येकी एक अशा प्रकारे पाच तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

तसेच कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर सर्व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा सुविधा व चाचण्या करून मिळतील अशी कॅशलेस मेडिक्लेम योजना धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सुरू करावी, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

Kesar Mango Cultivation : मराठवाडा, विदर्भातील केसर आंबा उत्पादनातील संधीची मांडणी

Horticulture Development : आंबा पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT