Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : नीरा कालव्याखालील शेतकऱ्यांचा उसाला फाटा

Agriculture Irrigation : शासन सध्याचा पाणीसाठा हा पिकांना किती देणार? आणि पिण्यासाठी किती राखीव ठेवणार? हे ही अद्याप स्पष्ट नसल्यामुळे नीरा उजवा कालव्याखालील अनेक शेतकरी दरवर्षीप्रमाणे उसाची लागवड करताना दिसत नाहीत.

Team Agrowon

Solapur News : वीर, भाटघर, देवधर ही नीरा खोऱ्यातील धरणे यावर्षी शंभर टक्के भरली नाहीत; तसेच शासन सध्याचा पाणीसाठा हा पिकांना किती देणार? आणि पिण्यासाठी किती राखीव ठेवणार? हे ही अद्याप स्पष्ट नसल्यामुळे नीरा उजवा कालव्याखालील अनेक शेतकरी दरवर्षीप्रमाणे उसाची लागवड करताना दिसत नाहीत.

यंदा पाऊसमान कमी झाले आहे. विहिरींना आणि विंधन विहिरींना दरवर्षीएवढे पाणी नाही; तसेच नीरा उजवा कालवा किती दिवस आणि किती वेळा सुटणार, हे ही शासनाकडून स्पष्ट होत नाही. या अडचणींच्या बाबी लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी सध्या धरणात पाणी असले तरी उन्हाळ्यात पाणी मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्यामुळे उसाच्या लागवडीकडे शंभर टक्के पाठ फिरवल्याचे दिसून येते.

अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी व आजही केळी पिकाला चांगले दर येते, हे लक्षात घेऊन केळीच्या रोपांची मोठ्या प्रमाणात कंपन्यांकडे नोंदणी केलेली आहे. या भागात श्रावण महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात केळीची लागवड होईल, अशी केळीची रोपे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच जनावरांना जगवण्यासाठी चारा पिकांची लागवड होत आहे.

या भागात सध्या गंगा कावेरी, सुफलम सीड्स, सिजेंटा, हायटेक, ६२४०, पायोनियर या कंपन्यांची मक्याची बियाणे मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. जनावरांना मुरघास करणे तसेच चारा पिके आणि मकेसाठी याचा उपयोग होत आहे. बाजारपेठेत रासायनिक खते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. रासायनिक खतांच्या किमती स्थिर असल्याने मका पेरणीबरोबरच रासायनिक खतांचा डोसही शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरू लागले आहेत.

जनावरांचा चारा महत्त्वाचा

दुधाला दर नसला तरीही जनावरे उपाशी ठेवता येत नाहीत, शेतकरी दुसरा जोडधंदा करू शकत नाही! अनेक शेतकऱ्यांनी आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील उभा ऊस कारखान्याला तुटून गेला आहे, अशा अनेकांनी जनावरांसाठी चारा म्हणून मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.

दूध व्यवसाय आता बस्स!

तालुक्यात सर्वात जास्त दूध उत्पादन होते; मात्र खासगी दूध संस्था या योग्य त्या प्रमाणात दर देत नसल्यामुळे भविष्यात दुग्ध उत्पादक इतर व्यवसायाकडे वळण्याबाबत बोलून दाखवत आहेत. दूध व्यवसाय आता बस्स, असे म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purpravan Gave: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६५ गावे पूरप्रवण

Alu Farming Success: वर्षभर अळूला तयार केली बाजारपेठ

Farmer ID for Loan Waiver : २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य?

Saline Soil Farming Success: अभ्यासूवृत्तीतून खारपाणपट्ट्यात यशस्वी शेती

Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?

SCROLL FOR NEXT