Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा; मदतीचा मार्ग मोकळा

Heavy Rainfall Loss : खरीप २०२४ मध्ये सततच्या पावसामुळे मोठे पीक नुकसान होवूनही अनुदानापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे.

Team Agrowon

Dharashiv News : खरीप २०२४ मध्ये सततच्या पावसामुळे मोठे पीक नुकसान होवूनही अनुदानापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. वस्तुनिष्ठ परिस्थितीचा आधार ग्राह्य धरून सततच्या पावसाच्या निकषात बदल करत राज्य नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत देण्यासाठी पुनर्वसन खात्याच्या सचिवांना सूचना दिल्या होत्या.

त्यावर सचिवांनी विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल मागविला होता. हा अहवाल सकारात्मक असून तो सचिवांकडे सादर झाला असल्याने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

५७ पैकी ३३ महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे बाधित असल्याची नोंद झालेल्या मंडळातील एक लाख ८१ हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारने २२१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

परंतु याच कालावधीत धाराशिव, भूम, परांडा आणि तुळजापूरातील २४ महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असताना प्रचलित निकषामुळे अतिवृष्टीची नोंद झाली नव्हती व त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले असताना मदतीपासून वंचित रहावे लागले आहे.

कांही मंडळात सदोष पर्जन्यमापकांमुळे अतिवृष्टी असतानाही त्याची नोंद झाली नाही. त्यामुळे २०२२ साली ओढवलेल्या आपत्तीवेळी ज्याप्रमाणे वस्तुनिष्ठ नुकसानीच्या निकषानुसार केलेल्या पाहणीचा अहवाल ग्राह्य धरून केलेली प्रक्रिया अनुसरून उर्वरित महसूल मंडळाना अगदी त्याचप्रमाणे तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली होती.

त्यानंतर महसूल व कृषी अधिकाऱ्यांसह नुकसानीची पाहणी झाली. प्रत्येक दिवशी किमान १० मिलिमीटर पाऊस झाल्यास या प्रचलित निकषात बसत नसलेल्या महसूल मंडळातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत, अशा शेतकऱ्यांना नुकसानीपोटी दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT