Crop Insurances  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurances : सरसकट ‘अग्रिम’ला विमा कंपन्यांचा नकार

Crop Insurance Claim : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी बुधवारी मुंबईत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम अंमलबजावणीचा आढावा घेतला. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने मदत करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांना दिले.

Swapnil Shinde

Pik Vima : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने सरसकट अग्रिम देऊन मदत करावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमा कंपन्यांना बैठकीत केली. मात्र कंपन्यांनी त्यास नकार देत पीकविम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जेथे वस्तुस्थितिजनक पंचनामे झाले आहेत, तेथेच अग्रिम देण्यात येईल, असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बुधवारी (ता. ४) पीकविम्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्यासह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्यातील जेवढ्या शेतकऱ्यांच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत, त्यांना अग्रिम द्या. पीक कापणी प्रयोगानंतर अपेक्षित उत्पादन घट नसेल तर राज्य सरकारला पीकविमा कंपन्या ‘बीड पॅटर्न’नुसार जी रक्कम देणे असेल त्यातून रक्कम घेऊन शकतात, अशी सूचना केली. मात्र कंपन्यांनी या प्रस्तावास नकार दिला. पीकविम्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जे नियम आहेत, त्या प्रमाणेच अग्रिम रक्कम देऊ, असे कंपन्यांनी सांगितले.

‘प्रस्तावांवरील आक्षेप वस्तुनिष्ठपणे तपासा’

‘‘बळीराजाला दिलासा म्हणून राज्य शासनाने एक रुपयामध्ये पीक योजना सुरू केली आहे. अशी विमा योजना सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे सांगत विम्यापोटी शेतकऱ्यांनी भरायचा हिस्सा राज्य शासन अदा करत आहे. या मागची शासनाची भूमिका विमा कंपन्यांनी समजून घेतली पाहिजे. विमा कंपन्यांनी प्रस्तावांवर जे आक्षेप घेतले आहेत, ते जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने तपासून घ्यावेत,’’ असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT