Farmers Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Seed MSP : रिजेक्ट सोयाबीन बियाण्यांना हमीभाव मिळवून द्या

Rejected Soybean Seeds : बीजोत्पादन कार्यक्रमात बीजप्रमाणीकरणाची प्रक्रिया डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत सुरू असते. तोपर्यंत हमीभावाची केंद्र बंद होतात. यंदा सोयाबीनचा बाजारात कमी भाव असून केंद्रावर हमीभाव मिळत आहे.

Team Agrowon

Latur News : बीजोत्पादन कार्यक्रमात बीजप्रमाणीकरणाची प्रक्रिया डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत सुरू असते. तोपर्यंत हमीभावाची केंद्र बंद होतात. यंदा सोयाबीनचा बाजारात कमी भाव असून केंद्रावर हमीभाव मिळत आहे. बीजप्रमाणीकरण होईपर्यंत हमीभावाची खरेदी बंद होणार आहे. यामुळे नापास (रिजेक्ट) झालेल्या बियाण्यांना हमीभाव मिळणार नाही.

या बियाण्यांची हमीभावाने खरेदी होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. २७) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) व्यवस्थापक योगेश कुंभेजकर यांच्याकडे केली.

श्री. कुंभेजकर यांनी घरणी (ता. चाकूर) येथील बाळासाहेब गोपाळराव शिंदे यांच्या शेतातील हरभरा नवीन वाण बीजी २०२१ - १ (पुसा मानव) बिजोत्पादन प्रक्षेत्राची पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे स्पायरल सेपरेटरची (चाळणी) मागणी करत रिजेक्ट बियाण्यांच्या भावाचा मुद्दा उपस्थित केला.

दरवर्षी नापास होणाऱ्या बियाण्यांचे प्रमाण ३० टक्के आहे. यंदा परतीच्या पावसाने सोयाबीन बियाणे खराब झाले असून त्यांची उगवण क्षमताही कमी झाली आहे. यामुळे यंदा ४० टक्के बियाणे नापास होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. यातच बाजारात सोयाबीनचे भाव कमी झाले असून बीजप्रमाणिकरण होईपर्यंत हमीभावाची खरेदीही बंद होण्याची शक्यता आहे.

या विचित्र कोंडीत महाबीजने हस्तक्षेप करुन नापास झालेल्या बियाण्यांची हमीभावाने खरेदी होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना श्री. कुंभेजकर यांनी महाबीजकडून हमीभावाच्या २५ टक्के जास्त भाव दिला जातो. हे दर समाधानकारक आहेत का, अशी विचारणाही त्यांनी केली.

महाबीजकडून घेण्यात येणारे बीजोत्पादन व त्यातून शेतकऱ्यास होणारे फायदे, महाबीज उत्पादित जैविक, ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाचा वापर करून पिकातील मररोग नियंत्रण, विविध पीक पद्धतीत, पिकात हवामानानुसार होणारे बदल आणि पिकांच्या वाणांचे गुणधर्म ओळखून शेतकऱ्यांनी पिकाची लागवड कशी करावी, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी महाबीजचे व्यवस्थापक (विपणन) प्रकाश ताट, महाव्यस्थापक (प्रक्रिया व अभियांत्रिकी) प्रशांत पागृत, परभणीचे विभागीय व्यवस्थापक डी. डी. कान्हेड, जिल्हा व्यवस्थापक एन. जी. इनामदार, कृषी क्षेत्र अधिकारी एस. एन. ईरलोड व पी. एस. काशीद व शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT