Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Jagtap Cooperative Sugar Factory : विधानसभा निवडणूक तोंडावर माजी आमदार जगताप आणि आमदार राजळे यांच्या साखर कारखानदारीला धक्का

Sugar Commissioner action against Jagtap Cooperative Sugar Factory : लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या असून विधानसभा निवडणुकांचा बिगुल पुढील काहीच महिन्यात वाजेल. यादरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (अहमदनगर) जिल्ह्यातील दोन कारखान्यांवर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी कारवाईचा प्रस्ताव ठेवला आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : लोकसभा निवडणुकींचा निकाल लागून काहीच दिवस उलटले आहेत. तर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांसह नेत्यांना विधानसभा निवडणुकींचे वेध लागले आहेत. यासाठी सध्या जोरदार तयारी केली जात आहे. यादरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (अहमदनगर) जिल्ह्यातील दोन कारखान्यांना प्रादेशिक साखर सहसंचालकांनी जोरदार झटका दिला आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील माजी आमदार राहुल जगताप आणि शेवगाव-पाथर्डीमधील भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. प्रादेशिक साखर सहसंचालकांनी माजी आमदार राहुल जगताप यांच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव तयार केला आहे. तर ऊसाच्या पेमेंट थकबाकीपोटी पाथर्डीतील वृद्धेश्वर कारखान्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रादेशिक साखर सहसंचालकांनी ठेवला आहे. 

श्रीगोंद्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखाना माजी आमदार राहुल जगताप यांच्याकडे आहे. जगताप हे कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या गाळपाचे पैसे थकीत आहेत. कारखान्याने तब्बल २१ कोटी तीन लाख ५० हजार रुपयांची थकबाकी केली. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. 

त्यामुळे साखर आयुक्तांनी ३१ मे रोजी कारखान्यांची जंगम व स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. तसेच या आदेशात  जंगम व स्थावर मालमत्तेवर सरकारचे नाव लावून ती विक्री करावी आणि शेतकऱ्यांच्या थकीत पैसे देण्यात यावे असे म्हटले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 

भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या पाथर्डीतील वृद्धेश्वर सहकारी कारखान्यावर देखील साखर सहसंचालकांनी कारवाईचा प्रस्ताव ठेवला आहे. राजळे यांच्या कारखान्याकडे ८ कोटी १४ लाख ४४ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे या कारखान्यावर देखील कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपसह भाजप आमदार राजळे यांच्या वर्चस्वाला सुरूंग लागल्याचे बोलले जात आहे. 

शरद पवार यांना धक्का? 

माजी आमदार राहुल जगताप शरद पवार यांच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आहेत. ते आगामी  विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. यादरम्यान त्यांच्याच अध्यक्षतेखाली असलेल्या कारखान्यावर स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई झाल्याने त्यांच्या खळबळ उडाली आहे. 

या कारखान्यांकडे थकबाकी 

दरम्यान माजी आमदार जगताप आणि आमदार राजळे यांच्या कारखान्याविरोधात कारवाईचा प्रस्ताव आल्याने जिल्ह्यातील साखर उद्योगात खळबळ उडाली आहे. तर काही कारखान्यांची  थकबाकीवरून धाबे दणाणणे आहेत. त्यामध्ये अकोल्यातील अगस्ती कारखाना असून कारखान्याकडे १३ कोटी ११ लाख ८५ हजार रुपयांची थकबाकी आहे. शेवगामधील गंगामाई कारखान्याकडे १७ कोटी ७ लाख ७८ हजार रूपये, पद्मश्री विखे कारखान्याकडे ५७ लाख ७६ हजार आणि नगर तालुक्यातील पियुष शुगरकडे २३ लाख ५८ हजार रुपयांची थकबाकी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT