Ration Shop Agrowon
ॲग्रो विशेष

Ration Grain : गव्हात कपात, तर सहा महिन्यांपासून साखर बेपत्ता

Antyoday Yojana : दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना अंत्योदय योजनेंतर्गत शासकीय स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणाऱ्या धान्यपुरवठ्यातील साखर गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता आहे.

Team Agrowon

Amravati News : दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना अंत्योदय योजनेंतर्गत शासकीय स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणाऱ्या धान्यपुरवठ्यातील साखर गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता आहे. तर, गव्हाची १० किलोने कपात करण्यात आली असून त्याऐवजी ज्वारी देण्यात येत आहे. सणासुदीला वितरित होणारा आनंदाचा शिधाही पूर्ण न आल्याने गौरी-गणपतीच्या मुहूर्तावर वितरित होऊ शकला नाही.

अंत्योदय योजनेंतर्गत जिल्ह्यातील १.२७ लाख लाभार्थींना दरमहा ३६ किलो धान्य अल्प दराने देण्यात येते. यामध्ये एक किलो साखर, १५ किलो गहू व २० किलो तांदळाचा समावेश आहे. स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणाऱ्या माहवारी रेशनमधून गेल्या सहा महिन्यांपासून साखर लाभार्थ्यांना मिळू शकलेली नाही.

शासनाकडून पुरवठा बंद असल्याने दुकानदार ते देऊ शकले नसल्याने लाभार्थी वंचित झाले आहेत. हा पुरवठा कधी होईल, याची माहिती पुरवठा विभागातूनही मिळाली नाही. दरमहा दिल्या जाणाऱ्या १५ किलो गव्हात कपात करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना गेल्या महिन्यापासून पाच किलो गहू देण्यात येत आहेत. गव्हाऐवजी १० किलो ज्वारी वितरित करण्यात येत आहे.

शासनाने नुकतीच ज्वारी खरेदी केली. ती साठवून ठेवण्याची पंचाईत असल्याने ज्वारी रेशनकार्डवर लाभार्थ्यांना देण्यात येऊ लागली आहे. तांदळाचा मात्र नियमित कोटा मिळत आहे. एका कार्डवर वीस किलो तांदूळ देण्यात येत आहेत.

मुहूर्तावर देण्याची घोषणा हवेतच

सणासुदीत लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा देण्याची राज्य सरकारची घोषणा गौरी-गणपतीच्या मुहूर्तावर मात्र हवेत विरली आहे. आनंदाच्या शिधात रवा, साखर, चणाडाळ व तेल असे साहित्य दिले जाते. सध्या पुरवठा विभागाकडे फक्त तेल व रवा आला आहे. साखरेचा पुरवठाच नाही. चणाडाळ आली नसल्याने किट्स वितरित करता आलेल्या नाहीत. त्यामुळे या आनंदाच्या शिधाची प्रतीक्षा कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT