Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : नांदेड विभागात पावसाअभावी गाळपात घट शक्य

Sugarcane Season : नांदेड विभागात मागील अडीच महिन्यापासून पावसाने पाठ फिरविली आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड विभागात मागील अडीच महिन्यापासून पावसाने पाठ फिरविली आहे. यासोबतच उसावर किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नांदेड विभागात ऊस गाळपात १० ते १५ टक्के घट होण्याची शक्यता नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने व्यक्त केला आहे.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत चालू गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये एक कोटी १२ लाख टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.

यात लातूर जिल्ह्यात ४६ लाख टन, परभणी जिल्ह्यात ३१ लाख टन, नांदेड जिल्ह्यात २४ लाख टन तर हिंगोली जिल्ह्यात १३ लाख टन उसाचे गाळप होईल, असे नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने साखर आयुक्तालयाला कळविले होते.

परंतु मागील अडीच महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे उसाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. यासोबतच अनेक ठिकाणी उसावर रसशोषण करणाऱ्या किडींचाही प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उसाच्या वजनात घट येत आहे. उसाच्या वजनात येणारी घट लातूर तसेच परभणी जिल्ह्यात सर्वाधीक असेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

या भागात पावसाचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत खूपच कमी नोंदले आहे. यामुळे साखर उद्योग यंदा अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी, उसाच्या नवीन लागवडीही घटल्या आहेत. तर अनेकांनी खोडवेही काढून ऊस घेणे बंद केले आहे. यामुळे पुढील हंगामातही उसाची चनचन कारखान्यांना जाणवणार आहे.

यंदा नांदेड विभागात २९ साखर कारखान्यांनी गाळपाला सुरुवात केली आहे. उसाअभावी चालू हंगाम दोन ते अडीच महिन्यात आटोपण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उसाची अशी परिस्थिती आणखी तीन वर्ष राहील, अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT